नवीन लेखन...

प्रेम …

तू कधीच नाही माझ्या माझे हृदय तुझ्या प्रेमात पडले तू स्वछंद बागडत राहिलीस ते विनाकारण झुरत राहिले … तू नाही माझ्यावर मी तुझ्यावर प्रेम केले तू गालात गोड हसत माझ्या मनाला भुलविले … तू नाही दगाबाज दगाबाज मीच आहे तुझ्यासारख्या कित्येकींना मी दुखावले आहे… आठवतात ते सारे क्षण त्यांच्या सोबत प्रेमाचे आणि तुझ्यावरील माझे प्रेम मला […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता […]

तू – मी

तू जग तुझी स्वप्ने मी जगतो माझ्या स्वप्नात तू फक्त आंनद मिळव मी जगतो माझ्या आनंदात तू मिळव सारी सुखे मी जगतो माझ्या सुखात तू जग तुझ्या विश्वात मी रमतो माझ्या जगात तू मिळव तुझे प्रेम मी जगतो तुझ्या प्रेमात तू जग फक्त तुझ्यासाठी मी जगतो तुझ्या जगण्यात तू फक्त माझी नाहीस मी नाही आता माझ्यात […]

अबोलता

तुझी अबोलताही बोलून जाते बरेच काही तुला उगाच वाटते मला काही कळत नाही मी तुला कधी तसा कळलोच नाही तुला विसरून मी कधी जगलोच नाही तुझ्यापासून तसा दूर मी कधीच गेलो नाही माझ्या हृद्यातील तुझी जागा कधी रिकामी झालीच नाही आता बोलली नाहीस तू तर जमणार नाही तुझ्या माझ्या मिलनाची आशा मग उरणारच नाही ©निलेश बामणे

अज्ञानात सुख असते…

जगाला कधीच न पडणारी कोडी मला पडलीच नसती … ती कोडी सोडविण्यात माझ्या आयुष्याची वर्षे खर्ची पडलीच नसती… भूत भविष्य वर्तमानाची भुते माझ्या मानगुटीवर कधी बसलीच नसती… देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची गरज मला वेड्यागत भासलीच नसती… माझी नजर फक्त सुखावर असती तर दुःखाची धग मला कधी लागलीच नसती … प्रेमातील वासना आणि वासनेतील मुक्ती शोधली नसती […]

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच […]

आजचा बाबा

आजकाल generation gap जरा कमी झालाय कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय … कालचे बाबा रागावणारे guardian असायचे आज काल समजावणारा friend झालाय बाबा काल घरातला पोलीस असायचे आज partner इन crime झालाय कालचे बाबा शाळेत यायचे तर धडकी भरायची आज स्कूल मध्ये जाताना hi फाईव्ह देताय कालचे बाबा हळदीच्या दुधासाठी रागवायचे आजचा बाबा कोल्ड […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची,  पाय जाती खोलांत प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात…१, सावध होवूनी प्रथम पावूली,  टाळावे ते संकट मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर,  दिसत नाही वाट….२, मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली…३, जागृतपणाचा अभाव असतां,  गुरफूटूनी जातो मोहमायेच्या आकर्षक गुणाला,  बळी तोच पडतो….४, वेगवान त्या जीवन […]

आठवण

बरेच दिवस झाले काही लिहिले नाही तुझ्या आठवणीत… तुझी ती आठवणच हरविली नाही ना ? माझ्या आठवणीत… कित्येक कविता मी सहज रचल्या आहेत तुझ्या आठवणीत… कित्येक कविता मी सहज सोडल्या आहेत तुझ्या आठवणीत… माझ्या आयुष्यातील कित्येक वर्षे वाया गेली तुझ्या आठवणीत… मी राहात होतो तुझ्या नाजूक हृदयातील माझ्या आठवणीत… आठवणीतील माझी तू तुझा मी राहतील जगाच्या […]

1 310 311 312 313 314 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..