मर्यादा
मर्यादेचा बांध घालूनी,मर्यादेतचि जगती सारे । अनंत असता ईश्वर,मर्यादा घाली त्यास बिचारे ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,त्याला असती मर्यादा । विचार सारे झेपावती,ज्ञान शक्ती बधूनी सदा ।। अथांग वाटे विश्वमंडळ,दाही दिशांचा भव्य पसारा । ईश्वर आहे थोर त्याहूनी,मोजमापाच्या उठती नजरा ।। कशास करीतो तुलना सारी,भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी । अज्ञानाने पडती मर्यादा,अनंत तत्वास त्याच क्षणी ।। […]
