त्यागवृत्ति
जीवनाच्या सांज समयीं । उसंत मिळतां थोडीशी ।। हिशोब केला स्वकर्माचा । वर्षे गेली होती कशी ।। दिवसामागून वर्षे गेली । नकळत अशा वेगानें ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं । जीवन गेले क्रमाक्रमानें ।। आज वाटे खंत मनीं । आयुष्य वाया दवडिले ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां । हातीं न कांहीं राहीले ।। ‘घेणे’ सारे आपल्यासाठीं । करीत जीवन घालविले ।। ‘देण्या’ मधल्या आनंदाला । मन […]