ये जवळ बस
‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं, मी बसलोही क्षीण तुझा कर करीं घेउनी सुखावलोही . नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू काय व्हायचें होतें ‘उद्या’च येथुन कायमचें तुज दूर ज़ायचें होतें. – सुभाष स. नाईक
‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं, मी बसलोही क्षीण तुझा कर करीं घेउनी सुखावलोही . नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू काय व्हायचें होतें ‘उद्या’च येथुन कायमचें तुज दूर ज़ायचें होतें. – सुभाष स. नाईक
स्वप्नातही बघताना ज्याची भीती वाटते ते वास्तव असते वास्तव आणि स्वप्न एकाच नाण्याच्या दोन बाजू एक चमकते दुसरे भासते वास्तव आणि स्वप्न दोन विरुद्ध गोष्टी एक खरी दुसरं खोटी वास्तवात जगायला हिम्मत लागते स्वप्नातही वास्तव नकोसे वाटते स्वप्नात मन स्वैर होते वास्तवात मन बंदिवान होते स्वप्नात कल्पनांचे डोंगर रचले जातात वास्तवात ते सर्व कोसळतात […]
दिन दिन दिवाळी शब्द कानी पडती आली आली दिवाळी ! खमंग रुचकर स्वाद काय पदार्थांच्या लगबगी बनविण्या गृहिणी सजती ! नटण्याची हौस किती चारचौघीत उठून दिसण्या पैठणी झुलती अंगावरी ! मुलींची लगबग रांगोळीसाठी तर्हे तर्हेचे रंग किती? रंगसंगती किचकट भारी ! घाई कंदिलासाठी मुलांची पंचकोनी का षटकोनी पारंपरिकच बरा दिसे ! गोवत्स द्वादशी दिन गोवत्साचे पूजन […]
नातवंड म्हणजे काय चीज असतं , आजी आजोबा मध्ये दडलेलं सँडविच असतं. नातवंड म्हणजे काय चीज असते , आई रागावली की आजी कडील धाव असते. नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा, पाळण्यातून अलगद काढून घ्यावा. नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी पुस्तकात जपलेली पानावरची जाळी. नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद सगळ्या चवींना बांधतो एक संध. नातवंड म्हणजे खव्याचा पेढा अखंड आनंद […]
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी ।। परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी ।। दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी । शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी ।। बळी कुणाच्या पडली तू […]
मला ओळ्खल्याचा दावा तिनेही नाही केला जिच्या मी प्रेमात पडलो… माझे डोळे तिलाही नाही वाचता आले जिच्या प्रेमात मी रडलो… माझ्या हृदयातील धकधक मी कधीच नाही तिला ऐकवत हसलो… जगासाठी जगता जगता मी केव्हातरी तिच्यासाठी स्वार्थाने जगायला शिकलो… दुरूनच तिचा आंनद पाहून आंनदी होत आनंदाने जगत राहिलो… एकाकी काल्पनिक त्या क्षितिजावर तिची वाट पाहात प्रेमवेड्यासारखा मी […]
जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल […]
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, […]
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे । संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।। चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा । लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा । कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।। संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते […]
तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions