नवीन लेखन...

दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी,   जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे,   कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।१।।   नशिबाची चौकट जाणूनी,    आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची,   जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।२।।   प्रयत्नांती असतो ईश्वर,    म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या,   ‘भविष्य’ शब्द  कामी आला  ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले   ।१। केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी   ।२। कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट    ।३। खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार    ।४।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   […]

जीवनाची उपयोगिता

दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जी जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरिर कुणाला, मना मारूनी बसावे लागे,  ईश्वरी नाम घेत सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

चंद्रडाग

हे शशिधरा तूं प्रेमळ सखा    साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी    राजा तूं नभाचा   लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी    काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती    तू डागाळला   डाग कसला तुम्ही मानतां    प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते   हे आम्हीं विसरतो   समजूं शकतो नीती बंधन    समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही    म्हणावे पापाचे   गुरू […]

आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

गर्भातील आत्मा

मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला, प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला…१   सो s हं चा निनाद सतत,  कानास आमच्या ऐकूं येतो, ‘तो’ मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो…२   मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे, नाश पावूनी साऱ्या स्मृति,  स्वत:सहित विसरे सगळे….३   आतां त्याचा निनाद ‘को..हं’,  प्रश्न युक्त तो […]

दिव्य शक्ति

बागेतील तारका   व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव तुझीया चरणा   ।।१।। तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले टिपण्या ते रुप   ।।२।। निनादाच्या स्वरी      तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी    ऐकण्या तुझे गीत   ।।३।। पुष्पातील सुवास      तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास     ओळखता तो आनंद   ।।४।। मधुर रसाची फळे     सर्वात […]

मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.com          

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar@gmail.com      

नाशाची वृत्ती

जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून.   […]

1 258 259 260 261 262 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..