नवीन लेखन...

तुजकडे पाहुनी मज

तुजकडे पाहुनी मज, गूढ काही वाटते, ऊन सावली खेळ, मनात, काहीसे दाटते,–!!! तुझी चौकोनी नक्षी, नजर फिरवी चोहीकडे, आपल्यापल्याड काय चालते, लपवून ती दर्शवते,—!!! काही दरवाजे उघडे, का ठेवले कोणासाठी, कोण तेथे वावरे, कोण तिथे, संगती सोबती,–!!! किरण प्रकाशाचे येती, सावल्यांशी खेळत खेळत, अस्तित्व कोणाचे असे, कुणामुळे पसरत पसरत,–!!! सुख दुखांचे शब्द ऐकशी, जरी भले तू […]

फूल उमलताना

फूल उमलताना, त्याकडे बघत रहावे, सावकाश उघडतानां, पाकळी पाकळी हाले,–!!! सुरेख पहा रंगसंगती,– सुबक अगदी ठेवण, आकार प्रफुल्ल होताना, आनंदित आपले मन,–!!! वाऱ्यावर झुलताना, कळ कुठली कोण दाबे, अचानक फुलाची पाकळी, आतून उत्फुल्ल होऊ लागे–!!! हालचाल होताना तिची, नाजूक परागकण दिसती, उघडझाप त्यांची पाहता, आपले नेत्र सुखावती, फांदीवरची अनेक फुले, आतून कशी हालती, जाईचे निरीक्षण करावे, […]

मित्रवंदाचा दीप विझे

मित्रवंदाचा दीप विझे, सोनसंध्याकाळ झाली, संधिकालाचे आगमन होता, पाखरे घरां निघाली,–!!! आकाश काळवंडून गेले, चांदणी उगवू लागली, तम दाटता भोवती, धरती बेचैन झाली,–!!! प्रकाशाचे किरण संपले, अंधाराचा नाच खाली, आभाळातून चंद्रमा पाहे, वसुंधरा अंधारलेली,–!!! तिला पाहून बुडालेली,– चांदवा पसरे रजत-प्रकाश, ओहोटीच लागलेली,– समुद्रकिनारी कुठे गाज,–!!! रजनीच्या कुशीत झोपे, चराचर सृष्टी सावकाश, पृथा चिंतातुर होई,– तिला भास्कराची […]

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।। पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची,  विसरे शरिर सौख्यापरि….२ शक्तीच्या जोरावरती […]

भिकाऱ्याचे पुण्य

रखरखत्या उन्हांत बसूनी, भीक मागतो एक भिकारी, जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी ।।१।। नजीक येत्या वाटसरूंना, आशीर्वाद तो देत असे, ‘प्रभू तुमचे भले करील’ हेच शब्द उमटत असे ।।२।। अन्न न घेता दिवस जाई, खात भाकरी एकच वेळां, दिवसभरीचे श्रम होऊनी, उपवास सदैव घडला ।।३।। पूर्व जन्मीच्या कर्मफळाने, दीनवाणी जीवन मिळाले, आज पुण्याच्या राशि […]

कल्पकतेमुळे निराशा

निराशेचे बीज पेरतो,आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी,जगा पाही त्याच दिशेने ।।१।। जाणूनी ईश्वरी स्वरूप,प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत,तशीच प्रतीमा दिसावी ।।२।। तपसाधना ती बघूनी,कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने,न होई त्याचे अवलोकन ।।३।। सभोवतालच्या वस्तूंमध्यें,जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात,भावना तशी उमटते ।।४।। अस्तित्वाची जाणीव देतो,हर एक घडीचा ठेवा, ध्यास लागतो आम्ही,परी कल्पिलेल्या […]

दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा,  गाई सुंदर गाणे, आवाजातील मधूरता,  शिकवी त्याला जगणे….१, जगतो देह कशासाठी,  हातपाय असता पांगळे मरण नसता आपले हाती,  जगणे हे आले…..२, लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते जगण्यासाठी सदैव त्याला,  उभारी देत होते…..३, गीत ऐकता जमे भोवती,  रसिक जन सारे नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ….४, असमान्य ते एकचि मिळता, […]

देह बंधन – मुक्ती

बंधन मुक्तीसाठीं असतां,  बंधनात ते पाडून टाकी कर्मफळाचे एक अंग ते,  टिपतां राही दुसरे बाकी…१, साध्य करण्या जीवन ध्येय,  देह लागतो साधन म्हणूनी सद्उपयोग करूनी घेतां,  साध्य होईल हे घ्या जाणूनी…२, हिशोब तुमचा चुकून जाता,  तोच देह बनतो मारक विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख….३, बंधन पडते आत्म्याभोंवती,  शरिरांतल्या वासने पायी वासनेच्या आहारी जातां, […]

जिवलगा

जवळी येताच तू जग नवे भेटले स्वप्न जागेपणी पाहते वाटले ll सुखाच्या सरी झेलतांना खुले पुन्हा ते तुझे रूप भासातले ll का शहारा फुटेना मनाला अता पांघरुनी तुझा श्वास घेता ll रंग माझा तुला गंध माझा तुला जिवलगा s s s s जिवलगा ll भास ध्यानी मनीं स्वप्नी जागेपणी तूच तू तूच रे जिवलगा s s […]

1 206 207 208 209 210 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..