नवीन लेखन...

योग्यतेनुसार यश

उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०   […]

भास

चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले  । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले  ।।   निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा  । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा  ।।   भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा  । दिसून येई  सदैव   मनावर जो उमटे ठसा  ।।   ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे  । मनावर बिंबून जाते […]

यश येईल मागे मागे

नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे  । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे  ।। १ निराशूनी जावू नकोस रागें रागें  । हिंमत बांधूनी जावेस  आगे आगे  ।। २ विणाविस यशाची शाल धागे धागे  । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे  ।। ३ सतत रहावे जीवनी जागे जागे  । तेव्हाच यश येत असते भागे भागे  ।। ४ डॉ. भगवान […]

जीवन परिघ

एक परिघ आंखले ,  विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते ,  त्याचे वरती ।।१।।   वाहण्याची क्रिया चाले,  युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा,  एकांच परिघात फिरती ।।२।।   जेंव्हां कुणीतरी थकून जाई  दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत  जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।   मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी  नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं  दिसत […]

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी । आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी  ।।१   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती । हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती ।।२   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी ।   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता । टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता ।।   डॉ. […]

 ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। १ सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। २ आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। ३ निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   […]

आज आहे रक्षाबंधन

— कवी – कुशल डरंगे आम्ही साहित्यिक ग्रुपमधून मी सदैव जपतो आज सार आठवतो ताई तुझं प्रेम साठवतो रक्षण करण्यास हात पुढे करतो आज आहे रक्षाबंधन भरून आले हे नंदन बहीण भावाचे हे स्पंदन नात्यात फुलवी सुगंधी चंदन बहिणीने बांधली राखी आज भावाच्या हातावर उजळला साज या बंधनात नसते कसले व्याज नाही उमगले या नात्याचे राज […]

प्रिय बहीण

— कवी : तुळजाप्रसाद धानोरकर आम्ही साहित्यिक प्रिय बहीण, तुझं आणि माझं नातं तसंच आहे, जसं रेशीमबंध तु आज बांधलेस, घट्ट,थोडंस सैल,आणि आपुलकीचं… —————————————— ◆आज मुद्दाम लिहावच लागलं… —————————————– आपलं हे नातं कधी बेगडी होऊ देऊ नकोस इतकंच… तुझ्या सुखात पुढे पुढे करणारे जर तुझ्या दुःखात दडून बसले तर तु समजून घे कि त्या नात्याला फार […]

 मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ […]

1 128 129 130 131 132 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..