नवीन लेखन...

सदृढ शरीरी चिंतन

योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची  । अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची  ।। जोम असतां शरीरीं तुमच्या,  करीता देहासाठीं  । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  ईश चिंतना पोटीं  ।। गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां  । एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां  ।। दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें  । त्या काळातील प्रचंड […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करिता जीव तोडून,  जेव्हा यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्ही,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हा,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होता,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

संस्कारा प्रमाणे

समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष,  टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह […]

रावण वृति

रावण नव्हता कुणी राजा,  ती होती व्यक्ति  । व्यक्तीचा तो इतिहास नव्हता,  ती होती प्रवृत्ति….१, आजही दिसती कित्येक आम्हा,  रावण या जीवनीं  । कशी रंगेल जीवन कथा,  रावणा वांचूनी…२, विरोधात्मक बुद्धी तुमची,  अडथळे आणते  । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३, सद्‌गुणांचा पाया खोलवर,  जेवढा तो गेलेला  । रावण वृत्ति हार जाईल,  त्याच मग वेळेला….४ डॉ. […]

 त्यांची शाळा

आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा, देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।।   कोठे शिकले तुकोबा, कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले, साधन दिसले नाहीं, परि तेज आगळे भासले ।।२।।   विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो, कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।।   त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती, वाहात होती बाहेरी, पावन […]

चंद्रग्रहण

राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला   प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी   आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे   सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्व सतत हवे   नष्ट होतील जीवजीवाणू,      आनंद त्यांचा जाईल विरुनी बलिदानाच्या पुण्याईने परि        सुटेल चंद्र मगरमिठीतून   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । […]

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।।   संसारांत रमलो    मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी   जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी   धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज […]

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। १ बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। २ संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ३ ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।।   राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।।   नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।।   आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस […]

1 127 128 129 130 131 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..