नवीन लेखन...

दुःख विसर बुद्धी

कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।   शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।।   पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।   देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई […]

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  –  –  – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।।   विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।।   देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।।   फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।   […]

तन मनातील तफावत

देह मनातील,  तफावत  दिसून येते  । चंचल असूनी मन सदैव,  शरीर परि बदलत राहते…१,   चैतन्ययुक्त मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही  । जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२,   परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो  । शरीराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो…३,   दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही  । परि शरीराचा अशक्तपणा,  मनास त्याक्षणी […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

अनुभवाचे शहाणपण

बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर  ।।१।।   श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो   ।।२।।   तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले   ।।३।।   धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो   ।।४।।   देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां […]

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला, रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।   जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।   नाच गावूनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।   छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते, प्रसंग जरी तो […]

1 126 127 128 129 130 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..