नवीन लेखन...

भावना उद्‍वेग

आकाशाला शब्द भिडले,  हृदयामधले भाव मनीचे चेतविता,  स्फोटक जे बनले  १ देह जपतो हृदयाला,  सदा सर्व काळी धडकन त्या हृदयाची,  असे आगळी  २ जमे भावना हलके तेथे,  एकवटूनी सुरंग लागता तीच येई,  उफाळूनी  ३ कंठ दाटता जीव गुदमरे आत रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात  ४ उद्‌वेग बघूनी शरिर,  कंपीत होते हृदयातील भाव जावूनी,  मन हलके होते  […]

जाळी

धागा धागा विणून,  केली तयार जाळी गोलाकार नि बहुकोनी घरे,  पडली निर निराळी….१, स्थिर सुबक घरे,  जसा स्थितप्रज्ञ वाटे सर्व दिशांचा तणाव,  न दिसे कुणा कोठे….२, तुटेल फूटेल तरी,  सैलपणा येणे नाही जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही….३, जगे तो अभिमानानें,  मान ठेवूनीया ताठ संसारामधील क्लेश,  झेलीत होती त्याची पाठ….४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी   विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी   हीच त्याची महिमा ।।१।।   जवळ असूनी दूर ठेवितो   आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो   कोणी न समजे त्यासी ।।२।।   मोठे मोठे विद्वान   त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन   विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।   कांहीं असती नास्तिक   कांही  असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी […]

मैनेचे मातृहृदय

आम्रवनांतील शोभा बघत,   भटकत होतो नदी किनारी मैनेची ती ओरड ऐकूनी,   नजर लागली फांदीवरती…१ एक धामण हलके हलके ,  घरट्याच्या त्या नजीक गेली पिल्लावरती नजर तिची,  जीभल्या चाटीत सरसावली…२, मैनेच्या त्या मातृहृदयाला,  पर्वा नव्हती स्वदेहाची जगावयाचे जर पिल्लासाठी,  भीती न उरी ती मृत्यूची…३ युक्त्या आणि चपळाईने,  तुटून पडली त्या मृत्यूवरी रक्त बंबाळ ते केले शरीर,  चोंच […]

पाषाणाच्या देवा

हादरून गेलो मनात पूरता,  ऐकून त्याची करूण कहानी केवळ एका दु:खी जीवाने,  हृदय दाटूनी आणीले पाणी  १ असंख्य सारे जगांत येथे,  प्रत्येकाचे दु:ख निराळे सहन करिल का भार येवढा,  ऐकूनी घेता कुणी सगळे  २ सर्व दुखांचा पडता डोंगर,  काळीज त्याचे जाईल फाटूनी कसाही असो निर्दयी कठोर,  आघात होता जाईल पिळवटूनी  ३ मर्म जाणीले आज परि मी, […]

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी,  अस्थिर आम्ही जगू शकतो अस्थिर आहे जग म्हणून,  स्थिर आम्ही जगू शकतो….१,   पोटासाठी वणवण फिरे,  शोधीत कण कण अन्नाचे थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे….२,   धरणी फिरते रवि भोवतीं,  ऋतूचक्र हे बदलीत जाते जगण्यामधला प्राण बनूनी,  चैतन्य सारे फुलवून आणते….३,   पूरक बनती गुणधर्म परि,  स्थिर असतो वा अस्थिर […]

प्रभूची धांवपळ

चकीत झालो बघूनी,  प्रभूला दारावरी त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी   क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी   कळले नाहीं मजला, ही त्याची रीत विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत   उपास तापास करुनी, देह शुद्ध केला भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला   गुंतले होते […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।।   आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  । सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।।   निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे  । कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच […]

होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ// ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१// मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार […]

समाधानी वृत्ती

कशांत दडले समाधान ते, शोधत असतो सदैव आम्ही, धडपड सारी व्यर्थ होऊनी, प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।   बाह्य जगातील वस्तू पासूनी, देह मिळवितो सदैव सुख, क्षणीकतेच्या गुणधर्माने, निराशपणाचे राहते दुःख ।।२।।   ‘समाधान’ ही वृत्ती असूनी, सुख दुःखातही दिसून येती, चित्त तुमचे जागृत असतां, समाधान ते सदैव मिळते ।।३।।   सावधतेने प्रसंग टिपता, समाधान ते येईल […]

1 107 108 109 110 111 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..