नवीन लेखन...

सुदाम्याला ऐश्वर्य

गरिब सुदामा बालमित्र ,   आला हरीच्या भेटीला बालपणातील मित्रत्वाची,   ओढ येवूनी मनाला….।। छोटी पिशवी घेवूनी हाती,    पोहे घेतले त्यात फूल ना फुलाची पाकळी घ्यावी,   हीच भावना मनांत….।। काय दिले वहीनींनी मजला,  चौकशी केली कृष्णाने झडप घालूनी पिशवी घेई,   खाई पोहे आवडीने….।। बालपणातील अतूट होते,   मित्रत्वाचे त्यांचे नाते मूल्यमापन कसे करावे,  उमगले नाही कृष्णाते….।। समोर असता सुदामा, […]

असामान्य व्यक्ती

सामान्यांतूनी असामान्य निर्मिती,  ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती,  चमचमणारे हिरे…..१, उदार होवूनी निसर्ग देतो,  समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला,  सोडूनी जीवन पर्वा……२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी,  समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३, जीवन कोडे नाहीं उमगले,  कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे,  काढती आपल्या परी….४, निर्जीव सजीव […]

द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।। द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।। वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘  धावूनी ये    मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।। धावूनी आला […]

साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।। १   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।। २   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । […]

रवि – उदयाचे स्वागत

उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे   //धृ//   उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे    //१// स्वागत करुया रविउदयाचे   रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली […]

निवृत्तीची वृती

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।।   बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।।   कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।   संसार […]

वेळेची ढिलाई.. कामाची किमया

हपालेल्या निष्ठूर काळा,  समाधानी तू कसा होशील बळी घेण्याचे सत्र तुझे ते,  केंव्हां बरे तू थांबवशील ?…१, नित्य तुला तें भक्ष्य लागते,  वेध घेई तू टिपूनी त्याचा मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा….२, अवचित कशी ही भूक वाढली,  मात करूनी त्या वेळेवरी सुडानें तूं पेटूनी जावूनी,  बळी घेतले गरीबांचे परी….३, काळ येई परि वेळ न […]

भावशक्तीची देणगी

भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले  ।।१   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म  ।।२   भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी  ।।३   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली,  केले तुझ […]

ऋणमुक्त जीवन

जीवन होते गर्दी मधले,  मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे,  येथील जगण्याचे…१, दिवस होता त्याचेसाठी,  तारेवरची कसरत धावपळ  करीत असता,  सावध ठेवी चित्त….२, जाण होती एकची त्याला,  मृत्यू आहे स्वस्त इथे सज्ज राही सदैव मनी,  स्वागत करण्या त्याते….३, ठेवीत होता धन थोडेसे,  स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां,  येत्या संकटकाळी….४, लिहून ठेवीले पत्र एक ते, त्याने खिशामाजी […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

1 106 107 108 109 110 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..