अलीकडील काळात कुटुंब नियोजन, दारुबंदी, निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणि मुली वाचवा अभियानातील संदेशही जनतेपर्यंत पोहचवला. त्यामुळे आजही हे आंबेडकरी जलशे समाज प्रबोधनात निश्चितच अग्रेसर आहेत यात दुमत नाही. […]
सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा […]
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर असणार्या काटरगाव सुब्रमण्यम मंदिरात श्री गणेशचे दर्शन घडते. या मंदिरात श्री गणेशाचे स्वतंत्र स्थान असून गजाननाचे पूजन अर्चन वैदिक पद्धतीने केले जाते. […]
देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या आदर्शांची वानवा असावी आणि संस्कारात पालक, शिक्षक आणि समाज कुठेतरी कमी पडतो आहे की काय अश्या संशयाच्या सावटाखाली एकामागोमाग एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन विषण्ण होते. […]
समाजात कश्या कश्याचे लोण आणि फॅशन येईल हे काही सांगता येत नाही. समलिंगी संबंधात काही भारतीय पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत आहेत. आपण कोणाबरोबर काय करतो, कुठे आणि काय बोलतो याचे जरासुद्धा भान नसते. परकीय देशांत समलिंगी संबंधाला मान्यता आणि कायदा केला असला तरी ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी सातत्याने आणि निकोप वाढीसाठी भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत. […]
जगणे ही मोठी आनंदयात्रा आहे. पण ह्या आनंदयात्रेचा वारकरी असणारा माणूस मात्र शुभ अशुभाच्या कल्पनांच्या ओझ्याखाली दबून जात असतो. या सर्व कल्पना निर्माण कोणी के्ल्या याचा आपण विचार करत नाही. […]
मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट! […]