नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आनंद लुटणारे मन !

आनंद लुटणारे मन ! सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर टिप्पणी करीत होत्या. मान डोलावाने, टाळ्या वाजवणे, वाहवा ! […]

अविस्मरणीय लेखणी

शालेय जीवनापासून माझ्या सतत सोबतीला असलेला आणि माझ्या सुख-दुःखाच्या भावनांना कागदावर उतरविताना लेखणीस्वरुपात अविरत साथ देणारा शाईचा पेन हरवल्याने मनात नाराजी ओसंडून वाहिली. त्या लेखणीचा सहवास असा अचानक कायमचा संपेल असे कधी मनात सुद्धा वाटले नव्हते.
[…]

चिखलातले कमळ

चिखलातले कमळ जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती.
[…]

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर करा – ईशान उपनिषद

समस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे.हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. आपण माझ्या सर्व जाणतात. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. – ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. ……
[…]

उधळण

उधळण परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले.
[…]

सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य

सूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बगीच्यात फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागीच्यातल्या खुर्चीवर बसून पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या सूर्य नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही. हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे. सत्यरूपी तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता……
[…]

कोलीडोस्कोप

कोलीडोस्कोप नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे.
[…]

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.

आषाढी एकादशी यात्रा- एक विचार. आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो.
[…]

ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स

८० च्या दशकात ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स ही कल्पना आपल्या भारतात चांगलीच रुजली व फोफावली. आधी फक्‍त हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले Glamarised कलाकारच स्वता:ला (फक्‍त चेह-याला) विकत होते. काळ बदलला तसे ’श्वास’ चित्रपटानंतर मराठी इंडस्ट्रीनेही कात टाकली. चांगले दर्जेदार चित्रपट मराठीत येऊ लागले. मराठी चित्रपटांकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळु लागला. त्याचाच फायदा मराठी नट नट्यांना झाला. मराठीत ज्या कलाकारांचे नाणे खणखणीत वाजत आहे, अशा भरपुर कलाकरांना वेगवेगळ्या संस्थांनी स्वत:चे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स म्हणून घेतले आहे. […]

मृत्यु / एक विचार

मरणाची भीती सर्वांनाच वाटले. पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा …
[…]

1 495 496 497 498 499 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..