तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार आणि प्रसार शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था सर्वच प्रसिद्धी माध्यमांद्वारे एवढ्या तत्परतेने करतात तरीही तंबाखूचे व्यसन काही केल्या कमी होताना दिसत नाही. गरजेपेक्षा जास्त पैसा खिशात खुळखुळू लागला की त्या पैशाला फाटे फुटतात आणि माणसे नको त्या व्यसनांच्या आधीन होऊन कुटुंबाची धूळधाण करतात. […]
अफगाणिस्तानात अलीकडे सापडलेल्या काही मुर्तीपैकी ही एक मूर्ती आहे. काही वर्षापूर्वी ही गार्देझ येथे सापडली होती व पुढे हीच मूर्ती काबुल येथे नेण्यात आली. काबुलचे रहिवाशी पामीर सिनेमाजवळ दर्गा पीर रतननाथ येथे तिची पूजा करीत असतात. […]
भारतीय संस्कृती व तिचा विस्तार हिमालयाच्या उत्तुंग पर्वत शिखरांच्या रांगेत चीन तुर्कस्तानच्या खोर्यात एका चिमुकल्या जगापासून थोड्याशा अलिप्त असलेल्या अशा अल्चीत कसा झाला ते थोडक्यात पाहू […]
कुठे म्हणून प्रदुषण नाही ते सांगा? वायूप्रदूषण, जलप्रदूषण, अश्या अनेक प्रदूषणाने आपण घेरालेलो आहोत. तरीही त्यातून मार्ग काढत प्रदूषणावर मात करीत आहोत. झपाटयाने होणाऱ्या औद्योगीकरणाने रासायनिक तसेच अन्य कारख्यान्यांतून बाहेर जाणारे सांडपाणी ज्यामध्ये तांबे, शिसे, कॅडमियाम, क्रोमियम व चांदी यांचे विषारी क्षार कळत न कळत मोठया प्रमाणात जलसाठ्यात मिसळले जाऊन जलप्रदूषण करतात आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात. रासायनिक आणि अन्य कारखान्यांतून बाहेर जाणारे सांडपाणी एका टाकीत साठवून त्यावर प्रक्रिया करून सोडल्यास जल प्रदूषण होण्यास मर्यादा येतील. परंतू असे सांडपाणी एका नैसर्गिक उपयानेही स्वच्छ व क्षारविरहित कसे करता येते ते पाहू. […]
आपण प्रत्यके महिन्यात कुठला ना कुठला दिन (डे) साजरा करत असतोच. नुकताच २२ एप्रिल २०१२ रोजी वसुंधरा दिन (अर्थ डे) सर्व जगभर साजरा करण्यात आला. आपल्या वसुंधरेला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जास्त कोणाची मदत मिळत असेल तर ती सूर्यदेवाची आणि त्या सूर्यदेवाचा दिन किंवा दिवस आहे ३ मे आणि हाच दिवस सर्व जगभर ‘सूर्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. यासाठी सूर्यदेवाचे आभार मानून त्यापासून मिळणाऱ्या उर्जेचा जास्तीत जास्त वापर हा मानवजातीच्या विकास व उन्नती करिता करून घेणे आवश्यक आहे आणि याचेच महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. […]
सध्या निसर्गाशी नाते तुटताना दिसते. आपण निसर्गाशी कसेही वागतो आणि नंतर त्याचे परिणाम भोगतो. हे आपल्याला हृतू बदलात दिसून येत कधी पाऊस जास्त पडतो, कधी उन्हाळा जास्त होतो तर कधी कडाक्याची थंडी पडते. हे टाळण्यासाठी त्याच्याशी सख्य करा, त्याला जगवा आणि स्वत:ही जगाला शिका. […]