नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

ही गुलाबी हवा (ललित)

ही गुलाबी हवा साक्षात चराचराला मोहजालात फसवू लागली.तिची माया प्रेमी युगलांना मोहजालात फसवूू लागली. रजईची उब,शेकोटीची उब,मायेची उब,दोहडची उब . सारं सारं फिके पडले. सगळीकडे एकच एक नशा होती ती या ,”गुलाबी हवेची” […]

शरयू नदीच्या भावना….

अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ? […]

२०२० या वर्षात हे घडणार !

* सुट्ट्यांची चंगळ * कंकणाकृती सूर्यग्रहण * सुपर मून दर्शन * ब्ल्यू मून योग * आश्विन अधिकमास
* चार गुरुपुष्ययोग * भरपूर विवाहमुहूर्त * लीप वर्ष असल्याने कामाला एक दिवस जास्त मिळणार ! […]

सावज

गोव्यातील ‘दोना पावला’  बीच पासून पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका टेकडीवर ते छोटेसे टुमदार घर होते. उंचावर असल्याने तिथून दोना पावला बीचचा निसर्गरम्य परिसर आणि दूरवर पसरलेल्या  समुद्राचे मोहक दृश्य दिसत असे. प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर मानकर यांचा तरुण अविवाहित  मुलगा सुधीर याच्या मालकीचे हे घर. […]

वर्क एन्व्हायरमेन्ट

जसजसे शहरात राहून तिथल्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या वातावरणात नोकरीच्या मागे धावून धावून दमल्यावर स्वतःच्या मालकीची एखादी वन रूम किचन किंवा वन बी एच के पर्यंतच मजल पोहचते तेव्हा स्वतःची रूम असून सोसायटी किंवा गृहसंकुलात आपण मेंटेनन्स देऊन भाड्यानेच उपऱ्या सारखे राहतोय अशी भावना निर्माण होते, त्यावेळेस स्वतःच्या गावात, स्वतःच्या शेतात आणि शेतातल्या मातीत उन्हा तान्हा मध्ये का होईना पण राब राबून सुखाने पोट भर तरी खायला मिळत होते असे विचार येतात. […]

गावोगावच्या चहाच्या आठवणी….

गेली जवळपास २०० वर्षे चहा आपल्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य अंग बनला आहे, इतकं की चहा शिवाय दिवसाची सुरुवात होत नाही … चहा शिवाय संध्याकाळ संपन्न होत नाही… चहाशी निगडित प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात – आहेत – रहातील… माझ्या ही कांही आठवणी आहेत, त्या ह्या निमित्ताने ताज्या झाल्या… मला ही बरं वाटलं जरा भूतकाळात फेरफटका मारायला…. […]

तांबोपाटा जंगलातला निवास – पेरू

दक्षिण अमेरिकेचा विचार मनात आला की ऍमेझोनची आठवण हमखास येते. नुसत ऍमेझोन म्हटल तरी तिचा सागरासारखा भासणारा विस्तार,त्यातले विविध प्रकारचे जलचर, प्रचंड उंचीची झाडे, दाट जंगल,तिच्या काठावरचे अजस्त्र कीटक, आणि त्यात उगवणा-या कमळांपेक्षाही जवळपास तीन फूट व्यास असणारी त्यांची पाने हे सर्व आठवायला लागते.त्यामुळे दक्षिण अमेरिकेला जायचे ठरवल्याबरोबर ऍमेझोन बघण्याचे आकर्षण होते. […]

डायरी (कथा)

कोकणातल्या रत्नगिरी जिल्ह्यतील या एका छोट्या खेडेगावातील या घरात राहायला येउन तिला आज दहा दिवस झाले होते.मधुराचा नवरा  शरद एका सरकारी बँकेत नोकरीला होता. काही दिवसापूर्वी त्याची बदली या गावात झाली होती. बँकेच्या एका खातेदाराच्या ओळखीने त्याला खूप कमी भाड्यात हे घर मिळाले होते. घर शहरापासून दूर व तसे एकाकी होते पण होते मोठे मजबूत अगदी चिरेबंदी वाड्यासारखे. […]

रूढी, परंपरा आणि तिचं सौभाग्य

एक विधुर म्हणून पुरुष कोणती ओळख घेऊन फिरतो सांगा तुम्हीच? त्याची बायको अल्पकाळी जाते म्हणून आपण त्याला अशुभ ठरवतो का? पण स्त्रियांच्याच बाबतीत हे सगळं का? इतर वेळी आपण बोलतो जन्माला येतानाच मृत्यूही घेऊन आलेला असतो माणूस मग अश्याच वेळी ते सगळं कुठे जात, का स्त्रीला कारणीभूत ठरवलं जात कोणाच्या मृत्यूसाठीपण? […]

सप्तपदी – लघुकथा

हसता हसता रमाकांतांनी सप्तपदीची शेवटची सुपारी ढकलली ती शेवटचीच ठरली. अवघ्या महिन्याभरात सगळा खेळ संपला होता. […]

1 355 356 357 358 359 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..