या साऱ्या वातावरणामुळे आणि आवडीमुळे, डीएसके विश्वमध्येही माझी बरीच ज्येष्ठ मित्र मंडळी असल्यामुळे गुरुवर्य द.भी. कुलकर्णी सरांचेकडे माझे नित्य जाणे होत असे. अनेक ज्येष्ठ मान्यवर त्यांच्याकडे येण्यास उत्सुक असत. […]
बाप रे बाप, माझी यादी संपता संपत नाहीए. मी पाहिलेल्या चित्रपटांमधील “जिंदगी ” विषयक, “जिंदगी” च्या अनेकविध छटा दाखविणारी ही (फक्त) हिंदी गाणी ! आज “अंकुर अरोरा मर्डर केस ” मधील असेच हे नितांत सुंदर, जिवंत आणि “जिंदगी “ला प्रश्न विचारणारे गाणे ! […]
खरे तर पुणे माझे जन्मस्थान (आजोळ) पण सातारा माझी कर्मभूमी. या दोन्हीही स्थळांची मला प्रचंड ओढ. माझी सारी जडणघडण सातारच्या मातीत झाली. पण पुढे वडिलोपार्जित व्यवसाय सातारला असून देखील पुणे, मुंबई येथे सुरू केला. १९८४ पुण्यात स्थिरावलो. […]
जून महिन्यातील साधारणपणे दुसरा आठवडयाचा सोमवार म्हणजे शाळा सुरु होण्याचा दिवस.. म्हणजेच आजचा दिवस!! दोन वर्षांपूर्वी या दिवशी छोटी मुलं नवीन कपडे घालून शाळेचा श्रीगणेशा करायला जात होती. […]
प्रत्येक व्यक्ती ही कवी असते! तसेच प्रत्येक व्यक्ती ही लेखक कलाकारही असते! असे मी माझ्या व्याख्यानातून नेहमी सांगत असतो. फक्त व्यक्तीला व्यक्त होता आले पाहिजे! त्यासाठी साहित्याची , वाचनाची , चिंतनाची , कलेची अभिरूची असणे ही अत्यंत अत्यावश्यक असते! सहवास आणी संगत यातून या गोष्टी जन्म घेतात. […]
लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून. भालजी पेंढारकरांचे ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ हे चित्रपट आम्ही पाहिले. […]
सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहेच आणी आपणा सर्व मित्रांचाही कृतज्ञ आहे. माणसं ही योगायोगाने भेटतात . माणसांचा संग्रह आणी त्यांचा सहवास हेच माझे या जन्मिचे संचित आहे असे मी मानतो. […]
अनेक ठिकाणी संपादक म्हणूनही मी जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे अनेक कथालेखक , व्यंगचित्रकार , व्याख्याते , कवी , या लोकांचाही परिचय झाला होता .ज्येष्ठ ख्यातनाम चित्रकार वारंगे हे पौराणिक काल्पनिक चित्रे खुपच सुंदर काढीत असत. मीही हौशी चित्रकार असल्यामुळे त्यांचेही मला खुप मार्गदर्शन झाले , या प्रवासात खुप काही शिकलो …खुप माणसे जोडली हे मात्र खरे ..! […]