नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

दिवंगत आत्मीय बाबासाहेब पुरंदरेंची आठवण !

त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली. गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो. […]

खरं तर मी हे करू शकतो/ते

जीवन ही एक सुंदर भेटवस्तू आहे , त्यामुळे आयुष्य गृहीत धरू नका. काहीवेळा मनासारखे होणार नाही मात्र तुम्हाला पेलणार नाही असे आव्हान तुमच्या कधी वाटयाला येणार नाही. ही आव्हानेच तुम्हाला अधिक ताकतवर बनवतील. […]

जसबीरची फरफट

अमिताभ बच्चन बरोबर ‘डाॅन’, ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘पुकार’, ‘महान’, ‘दोस्ताना’, ‘लावारिस’ चित्रपटात तिची केमेस्ट्री छान जुळली. फिरोज खानच्या ‘कुर्बानी’ चित्रपटातील तिच्यावरील चित्रीत ‘आप जैसा कोई, मेरे जिंदगी में आए..तो बात बन जाए..’ या नाझिया हसनच्या गाण्यामुळे ती चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरली. […]

गोमुचा डीसकाउंटेड स्मार्टफोन (गोमुच्या गोष्टी – भाग ३)

मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती. […]

माणसांना उभे करणारे शब्द !

” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी ! अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी – […]

मिडास टच

‘तिसरी मंझील’चा नायक खरंतर देव आनंद होता, काही कारणाने तिथं शम्मी कपूर नक्की झाला. आशा पारेख नायिका, प्रेमनाथ खलनायक. आरडीची झिंग आणणारी, एकसे बढकर एक अशी हिट गाणी! यातील थरारक रहस्याची गुंतागुंत विजय आनंदने उत्कृष्टरित्या सादर केली. प्रत्येक गाण्याचं टेकींग हे अफलातून केलं. […]

एक परीस स्पर्श (भाग – २४)

याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही.  पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही. […]

तू म्हणतीस तसंच

सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता. […]

एक परीस स्पर्श (भाग – २३)

आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता. […]

बस्तर परिसर (उगवता छत्तीसगड – Part 3)

जंगलाचे वरदान असलेला ह्या  बस्तर प्रदेशात अनेक औषधी वृक्षांच्या जाती, विविध प्राणी व पक्षी आढळतात. ह्या सर्वांचा आदिवासीच्या जीवनाशी निगडीत संबंध आहे. बस्तर प्रदेशातील अदिवासींचे  जीवन जंगलावर अवलंबून आहे. बस्तर भागातील आदिवासींच्या मुख्य जमातीची नावे आहेत अबूज मारिया, बायसन  हॉर्न मारिया, भात्र, हलबा, गद्वा, आणि गोंडा. त्यांच्यात अनेक पोटजाती सुद्धा आहेत. विलक्षण किरटया आवाजात गायले जाणारे लोकसंगीत, बायसनचे (गवा) शिंग डोक्यावर बांधून केलेले “काकसर नृत्य” हा आदिवासी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. […]

1 168 169 170 171 172 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..