नवीन लेखन...

बायको नावाचे अजब रसायन

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!” मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. […]

पिशव्या बघायची खोड

लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा.  […]

…आणि चष्मा लागला

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले. […]

बायको आणि तिचा मोबाईल

परवा पेपरात बायकोने नवर्‍याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली. […]

गावगुंड

आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत. […]

डोके ज्याचे त्याचे

झिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे ! […]

‘रोगा’यण !!

खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे ! […]

बायको आणि मैत्रीण

दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘ , अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते . ‘ये तुम्ही पोर पोर तिकडं पलीकडं खेळा ‘ म्हणणारी ,हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते . फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी ,मंद गालातल्या गालात हसते . काल पर्यंत ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी ‘चल […]

मंचकमहात्म्य – बारक्या

सकाळच्या रामप्रहरी अंड्याच्या दोन पोळ्या , दोन शिळ्या भाकरी ,बचकभर जवसाची चटणी, त्यावर कच्चं तेल आणि चार पातीचे कांदे, असा ‘अल्प ‘ नाश्त्याचा मुडदा पाडून ,मंचकराव पोकळ मुठीने आपल्या भरघोस मिश्या गोंजारत चौपस बंगईवर मंद झोके घेत बसले होते . अंगणात कोवळ्या उन्हाचे कवडसे बिचकत बिचकत डोकावत होते . मधेच पायाचा हलक्यासा रेटा देऊन मंचकराव झोपाळ्याची गती कायम ठेवीत . अश्या रम्य वातावरणात आणि भरल्या पोटी डोळे जडावणे साहजिकच होते. […]

1 10 11 12 13 14 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..