शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ? मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते. न मांसभक्षणे दोषः न […]
मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे. आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी नवान्न पानं गुड वैकृतम् च प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !! ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस. ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच […]
माणूस हा जन्मतः मांस न खाणारा प्राणी आहे. शरीर रचनेचा विचार केला असता, शारीरिक आणि मानसिक स्तरावर, मांस खाणाऱ्या प्राण्यांची तुलना, माणसाशी कधी होऊच शकत नाही. तरीदेखील माणूस मांस खाऊ लागला. काहीवेळा दुसरे अन्न मिळतच नाही म्हणून, तर काही वेळा केवळ चवीसाठी, काहीवेळा हाय प्रोटीन डाएट म्हणून तर काही वेळा औषध म्हणून. शरीररचनेच्या विरोधात म्हणजे निसर्गदत्त […]
दुसऱ्याच्या ताटात बघण्याअगोदर स्वतःचे ताट बघावे, या अर्थाची एक म्हण आहे. म्हणजे दुसरा काय करतोय, कसं करतोय, कशासाठी करतोय, हे पहाण्यापेक्षा मला कशाची गरज आहे ते पहावे, म्हणजे जीवनातील बहुतेक सर्व दुःखे नाहिशी होतील असे वाटते. अगदी तिच गोष्ट जेवणाची सुद्धा ! दुसरा काय खातोय, कशासाठी खातोय, का खातोय, हे खरंतर बघूच नये. कदाचित म्हणूनच माझी […]
माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच ” माया ” असे म्हणतात वाटतं. एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख. असो. मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, […]
शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते. या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे. काही जण समजत होते, माणूस शाकाहारी. काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. […]
मांसाहारी प्राण्यांची आणि शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मांसाहारी म्हणजे कार्निवोरस, जे फक्त मांसच खातात. शाकाहारी म्हणजे हर्बीवोरस. ज्यांचे मुख्य अन्न, शाक म्हणजे पालाच आहे. शाकाहारी प्राण्यांच्या जवळपास जाणारी आणखी एक जमात अस्तित्वात आहे, तिला फ्रूगीवोरस म्हणतात. ही जमात फळे, धान्य, धान्याच्या बीया आणि पाला हे सर्व खाते. पण ज्यांचे मुख्य अन्न, धान्य आणि बीया हे […]
काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली. जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही […]
शाकाहारी प्राण्यांचा जबडा आगदी आ वासून उघडत नाही. (अपवाद पाणघोडा ) थोडासाच उघडतो, पण यांचा खालील जबडा वर खाली तर होतोच, पण आजुबाजुला पण हलतो. रवंथ करायचे असते ना. तुकडे करून गिळायचे असतील तर जबडा मोठ्ठा उघडावा लागतो, पण छोटे छोटे घास करीत चावून बारीक करायचे असल्याने खालचा जबडा आणि वरचा जबडा विशिष्ट पद्धतीने एकमेकांवर घासावा […]
आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे लक्षात येते की, जगात कुठेही यांना बघीतलेत किंवा अभ्यासले तरी या प्राण्यांची वैशिष्ट्ये तीच रहातात. दक्षिण आफ्रिकेमधला कावळा काळाच असतो आणि अमेरिकन कावळा पण काळा तो काळाच ! रंगात बदल नाही, गुणसूत्रात बदल नाही, आहारात बदल नाही, की सवयी मधे. त्याचे काव काव ओरडणे सगळीकडे सारखेच […]