आहाराचा विचार कोणत्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो हे आपण पहात होतो. या सूत्रातील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, सात्म्यता. म्हणजे बाकी दुनिया गयी भाड मे, मला काय पचणारे आणि माझ्यासाठी अमुक पदार्थ चालण्णार आहे की नाही. हे ठरवणे. एखाद्याला पंधरा दिवस सलग पुरणपोळ्या खाल्या तरी पचतात, एखाद्याला पन्नास जिलब्या पण पचतात. पण तोच नियम सर्वांना लागू होईल […]
छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत, अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते. “अरे काय तू, आवरलंस एवढ्यात ? तू आणखी एक जिलबी खा, मी दोन जिलब्या जास्त खाईन…बघू कोण जास्त जिलब्या खाते ते ..” “मान्य मला. बघ हा, मागे यायचं नाही, ” झालं पैज लागली. एकच गलका झाला. […]
सूत्रातील पुढील महत्वाचा मुद्दा आहे, प्रकृतीचा ! . आहाराचा आणि प्रकृतीचा खूप जवळचा संबंध असतो. वाताची प्रकृती असेल तर आहार पण वातासारखा. सारखाच अनिश्चित. वारा आला तर भडकून पेटेल. नाही आला तर नुसता धूर. अगदी तस्सेच. अश्या वात प्रकृती वाल्यांनी आहारावर, आपल्या जीभेवर लक्ष आणि संयम ठेवला पाहिजे. जो पदार्थ काल खाल्ला तो पचला, पण आज […]
सूत्रातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे “भूक ” जशी पोट भरल्याची जाणीव आहे, तशी ही जाणीव पण प्रत्येकालाच असते. आयुर्वेदात याला तेरा वेगांपैकी एक वेग, असं संबोधले आहे. समजून घेण्याच्या दृष्टीने भूक म्हणजे चुलीतला विस्तव. हा पुनः वय, देश, काल यानुसार कमी जास्त होतो. आवडीचा पदार्थ असला तर भूक जास्तच लागते. आवडीचा पदार्थ नसला तर असलेली […]
आहार आणि वय, आहार आणि देश, तसच आहाराचा शरीरबलाशी मनोबलाशी संबंध असतो. बल म्हणजे ताकद, क्षमता. ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. सर्वसाधारण तरूण वयाची पोटात अन्न सामावून घेण्याची क्षमता जास्तीत जास्त 350 ते 400 ग्रॅम असते. आग्रहाने जरी जेवले तरी यापेक्षा जास्त अन्न पोटात राहू शकत नाही. जर जबरदस्तीने ठूस ठूस के भरण्याचा प्रयत्न केला तर उलटी होईल, […]
अकरावा भाग खास विशेष आहे अभ्यास । धरूनी सर्व शास्त्रास नैसर्गिक उपवास ।। बावीस भाग उपासाचे ठरवले कधी जेवायचे । हे कवन फलश्रुतीचे आपणापाशी ।। सुर्यास्ताशी जो जेवेल तो शतायुषी होईल । आनंदे भरील तिन्ही लोक ।। जेवणानंतरचे दोन तास आरोग्याचे असती खास मनी धरूनी ध्यास संकल्प दृढ करावा ।। घड्याळाचे दोन तास पुढे करावे खास […]
नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय. छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो. आम्ही घरीच येतो आठ वाजता घरी येणार कधी ? जेवण बनवणार कधी ? जेवणार कधी ? रात्री उशीराने जेवतो, तसे उशीरानेच झोपतो, ते तसे चालणार नाही का ? एकत्र कुटुंबात शक्यच नाही हो ! आम्ही दोघंही नोकरी करतो, कसं […]
सूर्य नसतो म्हणून…….. दिवस आणि रात्र यांचा, म्हणजेच सूर्य असण्याचा आणि नसण्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते आज बघू. फक्त मीच माझ्या मनानेच ठरवून हे नैसर्गिक उपवास सांगतोय असं नाही हो ! आज ससंदर्भच सांगतो. अष्टांगसंग्रह या ग्रंथात सूत्रस्थान अकराव्या अध्यायातील 63 या श्लोकात दोन शब्द आलेले आहेत. तो श्लोक मुळातून देतो, प्रातराशे तु अजीर्णे अपि, […]
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा. अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो. दिवेलागणीची वेळ म्हणजे कातरवेळ. यावेळी जेवू नये असं जुनी माणसं म्हणतात. तेही काही खोटं नाही. अगदी त्या कातरवेळी नाही, त्या आधी जेवलं तरी चालतं. पण […]