नवीन लेखन...

आपल्या रोजच्या आहारासंदर्भात अतिशय मौल्यवान माहिती या सदरात दिली जात आहे.

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग १

अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात. झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ? मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १५

कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे. भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १४

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ची जाहीरात आपण बघतो. अंडी खा, अशी जाहीरात का करावी लागते ? कारणही तसेच आहे.अंडे हे शाकाहारीच आहे, असेही सांगितले जाते. अंडे चांगले की वाईट, अंडे आरोग्य वाढवते की कोलेस्टेरॉल? यापैकी कशाचाही संदर्भ न देता, अंडे हे शाकाहारीच आहे, त्यात जीव नसतो, अशी जाहीरात करणे हा बुद्धी भेद करण्याचा […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १३

दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय…. ……आणि यात गैर ते काय ? …….पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १२

पशुंना मारताना कधी बघीतलंय ? त्यांच्या डोळ्यात कधी डोळे घालून पाहिलंय ? डोळ्यात येणारे अश्रु, मृत्युची दिसत असलेली भीती, ज्यांचा नंबर आता कापण्यासाठी लागणार आहे, त्यांची होणारी घालमेल कधी दिसलीच नाही का ? कल्पना करून बघूया, त्यांच्या जागी आपण असतो तर ? आपल्या मनात मारणाऱ्याविषयी किती घृणा निर्माण झाली असती ? हे इमोशनल ब्लॅकमेलींग नाहीये, पण […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ११

प्राण्यांचे मांस मिळवणे आणि खाणे एवढीच ही इंडस्ट्री नाही. तर याही पुढे जात पुढील मनीमेकींग सुरू झाले. भारतीय संदर्भ, भारतीय जीवनपद्धती, भारतीय संस्कार, भारतीय ग्रामीण मानसिकता यांच्यावर आघात करणारे आक्रमण घाऊक मांस उत्पादकांनी सुरू केले. निव्वळ मांसाच्या किंवा अंड्यांच्या विक्रीतून आवश्यक तो फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर बायप्राॅडक्टस कसे तयार करता येतील, याची विक्री योजना […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १०

परिणाम मांसाहाराचा परिणाम कसा कुठे होत जातो आणि निसर्ग चक्र कसे बिघडते ते पहा. भारतात मांसाहार सुरू झाल्यानंतर पशुधन झपाट्याने कमी होत गेले. कुक्कुटपालन सोडले तर शेळ्या मेंढ्या डुकरे, गाई म्हशी रेडे, यापैकी कोणत्याही प्राण्यांची शास्त्रीय पैदास केली जात नाही. शहरी लोकसंख्या वाढली, दुर्दैवाने मांसाहारी वाढले. पण ही तथाकथित कृत्रिम गरज भागवण्यासाठी लागणारे पशूधन वाढवण्यासाठी मात्र […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ९

जिथे जे उपलब्ध आहे, तिथे ते स्वस्त मिळते. ज्यांच्यावर मालकी हक्क आहे, ते विकत घ्यावे लागत नाही. प्राण्यांना मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जाते, त्याला खर्च जास्ती येतो. मांसपशुपक्षी तयार करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी, मांस टिकवून ठेवण्यासाठी वेगळी रचना करावी लागते, जी खूप महाग होते, निसर्गाच्या विरोधात होते. भाज्या धान्य उत्पादन करण्यासाठी जी शक्ती वापरावी लागते […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ८

मांसाहार करण्याची संयुक्तिक कारणे आणि समर्थन कितीही केले तरी ते लंगडेच होईल. कितीही शोधून काढा, माणसासाठी दररोज मांसाहार करणे हा कदापि आरोग्यदायी होणार नाही. आपली गाडी जर पेट्रोलवर चालणारी असेल, तर ती गाडी डिझेल किंवा राॅकेलवर चालेल का ? चालेलही. पण किती दिवस ? आणि चालवली तरीही आतमधे काहीतरी, कुठेतरी दोष उत्पन्न होणारच ना ! अगदी […]

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ७

असे का ? मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध. भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. […]

1 32 33 34 35 36 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..