दूषित अन्नपाण्यातून होणारे आजार – (२)
टायफॉइड- उलट्या होणे, पोट दुखणे आणि मुख्यतः ताप येणे ही टायफॉइडची लक्षणे. तापाची तीव्रता काही रुग्णांमध्ये कमी असते तर काहींमध्ये अगदी थंडी भरून खूप ताप येतो. थकवा खूप येतो. खोकलाही असू शकतो. सहसा हा आजार जीवघेणा नसतो, पण बरा होण्यासाठी बरेच दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. औषधांना दाद न देणाऱ्या टायफॉइडमध्ये दहा ते चौदा दिवस शिरेतून […]
