नवीन लेखन...

फास्टफूड किंवा जंकफूड म्हणजे नक्की काय ?

ज्या पदार्थांमध्ये उष्मांक किंवा कॅलरीज खूप जास्त प्रमाणात असतात व इतर पोषक द्रव्ये अगदीच कमी प्रमाणात असतात, असे पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या प्रकारात मोडतात. हे पदार्थ नैसर्गिक अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून रिफाइन करून बनविले जातात. फास्टफूडची उदाहरणे म्हणजे बटाट्याचे तळलेले चिप्स, फ्रेंच फ्राइज, बर्गर, चीझ पिझ्झा, (कारबोनेटेड) बाटलीबंद शीतपेय, इन्सटंट नूडल्स, बेकरीचे पदार्थ- (क्रीम) बिस्किट, कुकीज खारी, टोस्ट इत्यादी फरसाण, वेफर्ससारखे तळलेले पदार्थ, डोनट, फ्रँकी, भजी, सामोसे, वडापाव, पाणीपुरी, शेवपुरी इत्यादी चाटचे पदार्थ, चकल्या, शेव, केळ्याचे वेफर्स, मैद्याचा ब्रेड वर दिलेले सर्व पदार्थ फास्टफूड किंवा जंकफूड या गटात येतात. हे पदार्थ बनविताना मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केलेला असतो किंवा ते तेल किंवा तुपात तळलेले असतात. साखर, तेल आणि वनस्पती तूप या पदार्थांमधून हाय कॅलरीज (High Calories) किंवा उष्मांकाव्यतिरिक्त इतर पोषकद्रव्ये मिळत नाहीत. त्याचबरोबर या पदार्थांसाठी मैद्याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. गव्हापासून मैदा बनविताना त्यामधील जिवनसत्व, खनिज, तंतूमय पदार्थ (फायबर) काढून टाकले जातात. अशा प्रकारे निसत्व असा मैदा या पदार्थांचा सर्वात मोठा भाग असतो व कॅलरीजमध्ये आणखी भर पडते.

या सर्व पदार्थांमध्ये ताज्या भाज्या, फळे, कोंड्यासकट कडधान्ये, दाणे, डाळी यांचा वापर फारच कमी किंवा केलाच जात नाही. म्हणूनच या पदार्थांना ५५एम्टी कॅलरीज ७७ किंवा ५५ निव्वळ कॅलरीज ७७ म्हटले जाते. फास्टफूड आपल्या गरजेपेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅलरीज (उष्मांक) पुरवितात. संपूर्ण दिवसाला जर एखाद्या व्यक्तीला १८०० ते २००० कॅलरीजची आवश्यकता असेल तर हे पदार्थ (उदा. १ बर्गर + १ मोठा ग्लास शीतपेय+१ मोठे / पाकीट फ्रेंच फ्राइज+१ आईस्क्रीम) अर्ध्याहून अधिक म्हणजे १००० कॅलरीज एकदम पुरवितात. शरीराला एकदम एका वेळी एवढ्या कॅलरीजची आवश्यकता नसते. तेव्हा या जास्तीच्या कॅलरीजचे चरबीत (फॅटमध्ये) रुपांतर होते व हळूहळू वाढायला लागते.

-गीतांजली चितळे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..