नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

विवाहपूर्व तयारी

भारतीय कायद्याप्रमाणे मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे आहे. लग्नाच्या वेळी वधु-वर सुदृढ असावेत. विशेषतः मुलीच्या प्रकृतीची जास्त काळजी/ लग्नानंतर मातृत्व येणार- त्यासाठी मुलीची, शारीरिक अवस्था चांगली असणे जरुरीचे असते. गर्भारपणामध्ये मुलीच्या शरीरात पुष्कळ बदल होतात. श्वसनसंस्था, रुधिराभिसरण, पचनसंस्था इत्यादी संस्थांना जास्त काम करावे लागते. मातेच्या पोटात बाळ वाढते ते आईकडून होणाऱ्या अन्नाच्या […]

वार्धक्यातील दातांची काळजी : कवळी

नैसर्गिक दात चांगल्या स्थितीत ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची “संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दातांच्या काही रोगांमुळे शरीरात सेप्टिक फोकस होण्याचा संभव आहे. या कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांना थोडे किंवा सर्व दात काढून घ्यावे लागतात. दात काढल्यावर दुसरे कृत्रीम दात बसविणे जरूर आहे. असे न केल्यास जबड्याची हाडे झिजून जातात व अन्नपचनावर व शब्दोच्चारावर परिणाम होतो. गेल्या काही वर्षात कृत्रीम […]

बस्ती कर्म

आयुर्वेदानुसार वातज विकारांसाठी ‘बस्ती’ हे शोधनकर्म परमश्रेष्ठ मानलेले आहे. वाताचे मुख्य स्थान ‘पक्वाशय’ आतडे असून, त्या ठिकाणाचा वातदोष जिंकल्यास शरीरातील इतर वातविकारांवर नियंत्रण ठेवता येते. बस्तीयोग्य विकार- संधिवात, अंगदुखी, हृदयविकार, स्थुलता, कृशता, अर्धांग वायू (लकवा), कंपवात पारकिन्सन्स डिसीज, गर्भाशयाचे विकार इत्यादि. बस्तीचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु मुख्यतः दोन प्रकारचे बस्ती सध्या व्याधी नष्ट करण्याकरिता वापरले […]

अपघाताने खुब्याच्या सांध्याला होणारी इजा

हल्ली वाढलेल्या मोटर अपघातांमुळे या सांध्याला होणाऱ्या इजा वाढल्या आहेत. यात सांधा निखळणे, सांध्यातील उखळीला अस्थिभंग होणे, तसेच फीमरच्या डोक्याला व त्याच्याखाली असलेल्या मानेजवळ (नेक ऑफ फीमर) अस्थिभंग होणे आदी गोष्टी होऊ शकतात. खुब्याचा सांधा बाहेर येणे किंवा निखळणे हे मोठ्या मारानेच होऊ शकते. असे झाल्यास अगदी लवकरात लवकर तो सांधा उखळीत बसविणे अत्यावश्यक असते. नाहीतर […]

बालपणातील खुब्याच्या सांध्यांचे विकार

जन्मतःच काही मुले खुब्यातील सांधा निखळलेल्या अवस्थेत जन्मतात. याची कारणे अनेक आहेत; परंतु पायाळू जन्मलेल्या मुलांमध्ये असा प्रकार असण्याची शक्यता अधिक असते. मुख्यत्वे उखळ व्यवस्थित तयार न झाल्याने असा प्रकार संभवतो. याचे निदान अनुभवी डॉक्टरच करतात. कारण क्ष-किरणांद्वारे नवजात अर्भकामध्ये याचे निदान करता येत नाही. त्वरित योग्य निदान आणि उपचार सुरू करावे लागतात. पूर्वी या सांध्याला […]

ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना

आवाजाच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम वेळीच ओळखून त्यावर उपाय योजल्यास शारीरिक परिणामांचे धोके टाळता येतात. ध्वनी निर्माण करणाऱ्या यंत्रांवर कंपने रोखणे, निर्माण होणाऱ्या ध्वनीचे शोषण करणारे उपाय योजावेत. ध्वनीनिर्मिती कमी असणारी यंत्रणाच खरेदी करावी. कारखान्यातील यंत्रे ध्वनीरोधक लाद्यांचा पाया वापरून व कंपरोधक स्प्रिंग वापरून बनवतात. जुन्या यंत्रांवर ग्लासवूलचे जाड आवरण टाकून ध्वनी प्रसरण कमी होते. यावर जर डांबराचे […]

अंडाशयात साठलेल्या अनेक गाठींमुळे उद्भवणाऱ्या समस्या (उत्तरार्ध)

पॉलीसिस्टीक ओव्हेरियन सिण्ड्रोम (पीसीओएस) या आजाराची लक्षणे: १) अनियमित पाळी येणे व अति रक्तस्त्राव होणे. २) चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मुरूम येणे. ३) नको त्या ठिकाणी केसांची अधिक वाढ होणे (चेहऱ्यावर, छाती/ ओटी-पोटावर इत्यादी) केसांची अधिक वाढ होते. ४) लठ्ठपणा. ५) सोनोग्राफी तपासणी केल्यास | बीजांडाकोशात गाठीचा समूह दिसतो (पॉलिसिस्टीक ओव्हरी). ६) रक्तातील संप्रेरकाच्या प्रमाणात बदल होणे. […]

उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग २)

डॉक्टरांना विचारावे. सोडियम असलेली औषधे किंवा खाद्यपदार्थ यामुळे रक्तदाब वाढू शकतो. म्हणूनच ॲटासीड, कॅनमधील खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ, पापड-लोणची यांचे सेवन मर्यादित ठेवा. उच्च रक्तदाबाची औषधे दीर्घकाळ घ्यायची असल्यामुळे त्यांचे काही साइड इफेक्टस् दिसू शकतात. उदा. झोपून उठताना तोल जाणे, तोंड शुष्क होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला, झोप न लागणे, मलावरोध इ. अर्थात हे साइड इफेक्टस् दिसतीलच असे […]

उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग १)

उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक जीवनसाथी आजार आहे. भारतात आज १० कोटींहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिकाधिक लोक, विशेषतः तरुण वर्गही, याचे रुग्ण बनत आहेत. हा आजार सायलेण्ट किलर आहे, म्हणजेच फारसा गाजावाजा न करता तो आपले बस्तान बसवितो व दीर्घकाळपर्यंत रुग्णाला आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे ध्यानातही येत नाही. काही रुग्णांमध्ये […]

आनुवंशशास्त्र (भाग ३)

नात्यातल्या नात्यात लग्न झाल्यास आनुवंशिक आजार उद्भवतात असे आढळते. नात्यातील लग्नात, उदाहरणार्थ आतेभाऊ- मामेबहीण वा मामा- भाची इ., नवरा व बायको दोघांचे आजोबा/ पणजोबा इ.एकच असल्याने त्यांच्यातील सदोष जनुके दोघांमध्ये येण्याची, म्हणजेच दोघेही ‘कॅरिअर’ असण्याची शक्यता वाढते. कोणीही कधीही गर्भार राहिलं, तर नवीन येणाऱ्या बाळात रचनेचा वा कार्याचा काही ना काही दोष आढळण्याची एरवी ३-५ टक्के […]

1 16 17 18 19 20 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..