नवीन लेखन...

रसायने व कर्करोग

कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या प्राकृतिक व जैविक घटकांप्रमाणे काही रासायनिक पदार्थांचासुद्धा कर्करोगाशी संबंध असू शकतो. जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी जॉन हिल या इंग्लिश डॉक्टरला असे आढळले, की तंबाखूपासून बनविलेली तपकीर नाकाद्वारे ओढणाऱ्या व्यक्तींना नाकाच्या आतील भागात अर्बुदे होतात. या सौम्य अर्बुदांचे रुपांतर कर्करोगात होते हे त्यांना उमजले. ज्या काळी कर्करोगाबद्दल कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नव्हती त्या काळात जॉन हिलने प्रतिपादले, की तंबाखूच्या वापरामुळे कर्करोगाचे बीज पेरले जाते व तंबाखू व इतर घटकांमुळे कर्करोग होतो. या प्रज्ञावंताचे नाव आजही लक्षात आहे कारण त्याच्या विधानाची सत्यता अनेक प्रयोगांद्वारे सिद्ध झाली आहे.

जॉन हिलच्या वरील निरिक्षणानंतर पंधरा वर्षातच १७७५ साली पर्सिव्हल पॉट या डॉक्टरने एक शोधनिबंध प्रकाशित केला. यात त्याने लिहिले, की इंग्लंडमधील घरावरील धुरांडे किंवा ‘चिमणी’ साफ करणाऱ्या मुलांना त्वचेचा कर्करोग होतो व त्याचे कारण कोळशाची काजळी त्वचेला सतत चिकटणे हे आहे. या शोधामुळे कोळशाची काजळी कर्करोगास कारणीभूत आहे हे निश्चितपणे समजले; परंतु या शोधाचा मागोवा घेतला गेला नाही. त्यानंतर जवळजवळ दीडशे वर्षांनी कर्करोगाच्या उत्पत्तीबद्दल कुतूहल निर्माण झाले व जपानी शास्त्रज्ञांनी दाखवून दिले, की सशांच्या कानावर कोळशाची काजळी सतत लावल्यास त्या जागी त्वचेचा कर्करोग होतो. या शोधामुळे कोळशाच्या काजळीतील कर्करोगजन्य रसायन विलग केले गेले. रवासाद्वारे शरीरात जाणारे वातावरणातील पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, बुरसलेल्या अन्नपदार्थातून पोटात जाणारे ॲफलॉटॉक्सिन व्यवसायामुळे होणारे रंगद्रव्य ॲसबेस्टोस व इतर रसायनांचा संपर्क व त्यामुळे होणारे गग यांची माहिती मिळाल्यावर कर्करोगजन्य रसायनांची एक प्रचंड जंत्री तयार झाली.

त्यातच माणसाच्या जीवनशैलीशी निगडित असणाऱ्या तंबाखू व मदिरा या पदार्थांची भर पडली. कोळशाच्या काजळीत किंवा डांबरात असलेल्या बेंझोपायरिन या द्रव्यामुळे फुप्फुसाचा, तसेच त्वचेचा कर्करोग होतो. बुरशीयुक्त अॅफलाटॉक्सिनच्या सेवनाने यकृताचा कर्करोग होतो, घरबांधणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ॲसबेसटॉसचा संबंध मीसोथिलियोमा या कर्करोगाशी आहे तर दारुच्या व्यसनाने अन्ननलिकेचा, तसेच यकृत, जठर इत्यादींचा कॅन्सर होतो हे सिद्ध झाले.

-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..