नवीन लेखन...

अमिबाजन्य विकार

जगातील अंदाजे १० टक्के लोकसंख्या अमिबाजन्य विकाराने बाधीत आहे. अमिबाजन्य विकार एष्टअमिबा हिस्टोलिटिका या अंतःपरजीवीमुळे होतो. माणसात याचा संसर्ग अन्नावांटे होतो. चार केंद्रके असलेली याची पुटी (सिस्ट) बाधीत अन्न व पाण्याद्वारे पोटात जाते. माशा, झुरळे यांच्यामुळे रुग्णाच्या विष्ठेतील अमिबाच्या पुटी अन्न व पाण्यात पसरतात. साधारणपणे जगातील ४० ते ५० लाख लोकांना याची लागण होते व ४० ते ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात.
अमिबाचा शोध रोझेनहॉफने १७५७ मध्ये लावला. सतत आकार बदलण्याच्या त्याच्या स्वरूपामुळे त्याला ‘प्रोटिअस ॲनिमलक्युल’ नाव मिळाले. कारण ‘प्रोटिअस’ नावाचा ग्रीक देव असेच रूप बदलत असे. २२० ते ७४० मायकॉन लांबी असलेला अमिबा दोन स्वरूपात आढळतो. परिस्थिती अनुकूल असेल तर क्रियाशील अवस्थेत हा जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लाने मरतो. प्रतिकूल परिस्थितीत पुटीच्या (सिस्ट) अवस्थेत यावर जठरातील आम्लाचा परिणाम होत नाही. पुटी लहान आतड्यात गेल्यावर स्वादुपिंडस्रावाचा कवचावर परिणाम होऊन अमिबा मोकळे होतात व अनेक क्रियाशील अमिबे आतड्यात तयार होतात. ते सर्व मोठ्या आतड्याच्या पहिल्या भागात जातात. त्यांनी तयार केलेल्या सायटीलायसीन विकराची आतड्याच्या श्लेष्मल पटलावर क्रिया होते. तेथे व्रण (अल्सर) तयार होतात व शौचास जास्त होऊन त्यातून श्लेष्म व रक्त पडते. या स्तरातून रक्तवाहिनीवाटे अमिबे यकृत, मेंदू, फुप्फुसे व प्लिहा यांच्यात प्रवेश करतात व पूयुक्त फोड निर्माण करतात. (अमिबिक अॅब्सेस) अमिबापुटी पोटात गेल्यापासून चिन्हे दिसायला लागण्याचा उबवणी काळ २ ते ६ आठवडे. ज्या रुग्णांना स्टिरॉइडस् चालू असतात त्यांना याची बाधा लवकर होते. रुग्णास जुलाब होतात, मल दुर्गंधीयुक्त असून, त्यात श्लेष्म व काळपट रक्त पडते. भूक मंदावणे, अशक्तपणा, पोटात उजव्या बाजूस अंधनाल (सीकम) दुखू लागते. अमिबामुळे मोठ्या आतड्याचा दीर्घकालीन दाह होऊ शकतो.

(कोलायटीस) रक्तातून यकृतात गेलेले अमिबा पूयुक्त फोड निर्माण करतात. यात रुग्णाला ताप येतो, पोटात उजव्या बाजूच्या वरच्या भागात दुखते, उजव्या खांद्याकडे कळ जाते. सहसा जुलाब होत नाहीत. स्त्रियांत मूत्रसंस्था व जननेंद्रिये यावर परिणाम होऊ शकतो. निदान- विष्ठेची व रक्ताच्या तपासणीने उपचार पूर्णपणे करावेत नाहीतर रुग्ण दीर्घकालीन अमिबावाहक होतो, असे वाहक दिवसाला १५ दशलक्ष पुटी विष्ठेवाटे बाहेर टाकतात. प्रतिबंधक- वैयक्तिक व परिसराची स्वच्छता. अन्न झाकावे व पाणी उकळावे. शौचानंतर हात स्वच्छ धुवावेत.

डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..