नागीण (उत्तरार्ध)
विषाणूंमुळे होणाऱ्या नागीण या रोगाविषयी समाजात अनेक गैरसमज प्रचलित ाहेत. एका बाजूने सुरू झालेले पुरळ शरीराभोवती संपूर्णपणे दुसऱ्या बाजूपर्यंत पसरून त्याची दोन्ही तोंडे एकमेकांना मिळाली तर आजाराचे स्वरूप गंभीर होते, असा एक गैरसमज आहे; परंतु यात अजिबात तथ्य नाही. चेतासंस्थेला विषाणूंची बाधा होत असल्याकारणाने हा रोग साहजिकच चेतासंस्थेच्या अनुषंगाने वाढत जातो. त्यामुळे नागीणीने विळखा घातल्यासारखा आभास […]
