नवीन लेखन...

तोंडावाटे द्रवरूप औषध घेताना घ्यावयाची काळजी

सोल्युशन (द्रावण), सिरप, लिंक्टस, सस्पेंशन, ड्रॉप्स (थेंब) अशा रुपात तोंडावाटे घ्यावयाची द्रव औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे सेवन करताना खालील काळजी घ्यावी. या औषधांचा योग्य डोस पोटात जाण्यासाठी बाटलीवरील मापाचा कप वा मापाचा चमचा वापरणे आवश्यक आहे. साधारणतः ही औषधे ५ मिलि. म्हणजे १ टिस्पूनच्या पटीत असतात. मापाच्या कप/ चमच्यावर ५ मिलि., ७.५ मिलि., १० मिलि. अशा खुणा असतात.

जर घरगुती कुठल्याही चमच्याने औषध घेतले तर त्याचा डोस कमी/ जास्त होतो. म्हणून घरगुती चमचा प्रकर्षाने टाळावा. मापाचा कप/ चमच्याने औषधे घेतल्यावर त्यास थोडे औषध चिकटून राहू शकते. त्यात पाणी घालून घ्यावे. म्हणजे पूर्ण औषध पोटात जाईल व नंतर कप/ चमचा स्वच्छ धुवून कोरडा करावा. लहान मुलांसाठी ड्रॉपर वा सिरिंज उपलब्ध असते. बहुतांशी औषधे पाण्याबरोबर घ्यावयाची असतात. फक्त खोकल्यासाठीचे सिरप, लिंक्टस याचा घशावर परिणाम राहावा यासाठी ते घेतल्यावर लगेच पाणी न पिता, थोड्या वेळाने प्यावे. ‘सस्पेंशन’ (ज्यात पावडर द्रावणात विरघळलेली नसते) हे नेहमी बाटली हलवून घ्यावे व मगच त्याचा डोस मापावा. ‘ड्राय सिरप’ मध्ये औषधाची कोरडी पावडर बाटलीत असते. विशेषतः अॅण्टिबायोटिक्स या स्वरूपात अधिक दिसतात. घरी आणल्यावर त्यात उकळून पूर्ण थंड केलेले पाणी बाटलीवर असलेल्या खुणेपर्यंत घालून मग हे मिश्रण चांगले हलविणे जरुरी असते. (प्रत्येक वेळी घेताना बाटली हलवून घेणे आवश्यक असते.) जर गरम वा कोमट पाणी घातल्यास औषधाचे विघटन होऊ शकते. म्हणून उकळून पूर्ण थंड पाणीच वापरणे जरुरीचे असते. ही सर्व द्रव औषधे बसलेल्या स्थितीत घेणे उत्तम. ही द्रव औषधे सहसा फ्रीजमध्ये ठेवण्याची जरुरी नसते; पण सूर्यप्रकाश, दमटपणा, उष्णता, लहान मुले, पाळीव प्राणी यांपासून मात्र जरूर दूर ठेवावीत.

डॉ. मंजिरी घरत
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..