कर्करोग व आनुवंशिकता
कर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते. आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकांच्या वारशामुळे सिस्टीक फायब्रोसीस, सिकल सेल अॅनिमिया यासारखे रोग होतात. कर्करोग मात्र आनुवंशिक नसून, मुख्यत्वे माणसाच्या जीवनशैलीमुळे होतो, असे दिसून येते. त्यामुळे प्रश्न पडतो, […]
