नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ५

१८) मानसिक असंतुलन (Mental instability): मानसिक असंतुलन अनेक कारणांमुळे बिघडते. शारीरिक व्याधी, परावलंबित्व, आर्थिक विवंचना, अहंकार, एकटेपणा, आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव अशा कित्येक गोष्टींमुळे मानसिक संतुलन बिघडते. तरुण वयात परिवरासाठी आपण घेतलेले कष्ट, त्याग, मुलाबाळांच्या संगोपानासाठी साठी घेतलेले परिश्रम यांची कुणालाच जाणीव नाही अशी काहीशी मनस्थिती या वयात होते. हे सर्व वैयक्तिक स्वभावशी निगडीत आहे. […]

देवतात्मा  हिमालय  – भाग 2

भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर पामिरच्या पठारापासून पूर्वेला दूरपर्यंत अनेक पर्वतरांगा जातात. आसामच्या टोकापर्यंत जाऊन तिथून त्या खाली दक्षिणेकडे वळतात. ह्या सगळ्याच पर्वतमाला आपण हिमालय म्हणून ओळखतो. पण ह्या एवढ्या मोठ्या प्रचंड प्रदेशात पवित्र म्हणून आपण परंपरेने ओळखणारी जास्तीत जास्त स्थाने उत्तराखंड भागात आहेत. परशुरामासारखा एखादा दैवी पुरुष तेवढा आसामच्या टोकापर्यंत गेलेला दिसतो. म्हणून तिकडे परशुराम कुंड आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’ […]

स्वदेशी धर्म आणि ग्राहक धर्म

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला सूर्यकांत पाठक यांचा लेख पूर्वी ‘ईस्ट इंडिया कंपनी ने भारत लुटला. त्याविरोधात आपण लढलो. स्वातंत्र्यानंतर देशी उद्योगांनीही भारताची खरं तर अशीच लूट केली; पण ते ‘स्वदेशी’ उद्योग म्हणून आपण उगीचच त्यांना पावित्र्य बहाल केलं. ‘खा-उ- जा’ धोरणाअंतर्गत पुन्हा विदेशी उद्योग आले, नि त्यांनी लूटच चालू केली. ते […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ४

११) शारीरिक थकवा (Weakness) – शरीराला अनेक कारणांमुळे थकवा येतो. रक्तात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता, रक्तातील लोहाचे (हिमोग्लोबिनचे) प्रमाण खालावणे, अत्यधिक श्रम, उन्हात फिरणे, प्रदीर्घ आजार अशी शेकडो कारणे मिळतील. कारण शोधून मग त्यावर उपाय करणे नक्कीच योग्य असते. तरीही ज्याने लगेच तरतरी वाटेल आणि शरीराला पोषणही मिळेल असे काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. अशावेळी […]

भारतमातेच्या वीरांगना – 14 – राणी चेन्नमा

राणी चेन्नमा आणि त्यांच्या सैन्याने ह्या हल्ल्याचे जोरदार प्रतिउत्तर दिले. इंग्रजांना नुसतीच हार पत्करावी नाही लागली तर त्यांचे मोठे अधिकारी मारले गेले, त्याचबरोबर दोन इंग्रज अधिकाऱ्यांना युद्धबंदी बनवले गेले. इंग्रज अधिकारी कॅपलीन ह्यांच्याशी तहात हे बंदी सोडले गेले की युद्ध समाप्त होईल आणि कित्तूर स्वतंत्र राहील. […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ३

वृद्धापकाळात होणारे मुख्य आजार आणि संक्षिप्त उपचार २) हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) – उतार वयात हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. सुरुवातीला त्याची फारशी काही लक्षणे दिसत नाहीत पण लहानशा आघातमुळे पटकन हाड मोडण्याची (fracture) शक्यता वाढते. अशा वयात अस्थिसंधान (हाडे जुळून येणे) होणे कठीण असते, लवकर झीज भरून निघत नाही शिवाय वयोपरत्वे हालचाली […]

देवतात्मा हिमालय – भाग 1

सुमारे ५ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सूर्याचा जन्म झाला व त्याचेच एक अपत्य म्हणजे आपली पृथ्वी. पृथ्वीसुद्धा सूर्यासारखीच लालभडक रसरसलेली होती. त्यावेळी पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप, वायुरूप असा सूर्याभोवती फिरणारा एक गोळा. काळ कुणासाठीच थांबत नाही. वर्षांमागून वर्षे सरत होती. पृथ्वीचा हा गोळा थंड होऊ लागला. पृथ्वी बाह्यतः थंड झाली. पण अंतरंगात मात्र धगधगत राहिली. पण थंड […]

भारतमातेच्या वीरांगना – 13 – कमलादेवी चटोपाध्याय

१९३० साली गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला त्यात जे ७ प्रमुख होते त्यातील एक कमलादेवी होत्या आणि दुसऱ्या स्त्री म्हणजे अवंतीकाबाई गोखले. कमलादेवी मुंबईतील हाय कोर्टात पोचल्या की आत्ताच तयार केलं गेलेलं सत्याग्रह मीठ जज साहेब घेतील का? २६जानेवारी १९३० ला झालेल्या गदारोळात आपल्या जीवापेक्षा आपल्या तिरंग्याला जपण्याऱ्या कमलादेवी चटोपाध्याय सगळ्यांच्याच लक्षात राहिल्या. […]

ग्राहककेंद्री मानसिकता

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. अविनाश कोल्हे यांचा लेख विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९१७ साली रशियात मार्क्सवादी क्रांतीनंतर जगात भांडवलशाहीला सशक्त पर्याय समोर आलाय, असे वातावरण काही वर्ष निर्माण झाले होते. पण १९९० साली सोव्हिएत युनियन पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळल्यानंतर भांडवलशाहीचा विजय झाला, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जगभर झपाट्याने […]

1 56 57 58 59 60 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..