नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

सेफ्टी रेझर

रेझरचा वापर अगदी पुरातन काळापासून केला जात होता पण ते फारसे प्रगत नव्हते. इतिहासपूर्व काळात शार्कचे दात, शंख व फ्लिंट यांचा उपयोग रेझरसारखा केला जात असे. इजिप्तमधील उत्खननात सोने व तांब्याचे रेझर सापडले होते. रोममध्ये अगदी पुरातन काळात ल्युसियस तरक्विनस प्रिस्कस या राजाने पहिल्यांदा रेझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला. […]

बहुपयोगी सोलर पंप

आजच्या काळात वीज भारनियमन ही फार गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पर्यायी ऊर्जास्रोत म्हणून सौरऊर्जेकडे बघितले जाते. सौरऊर्जेत सुरुवातीला जरी गुंतवणूक जास्त वाटत असली तरी नंतर ती दामदुपटीने 31 वसूल होते. सौरऊर्जेवर चालणारे असेच एक साधन म्हणजे सोलर पंप. […]

 हजार तोंडांचा रावण

विश्वनाथ शिरढोणकर हे मध्यप्रदेशात स्थायिक असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतदेखील त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हजार तोंडांचा रावण या लघुकथासंग्रहाची ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी लिहिलेली प्रस्तावना. […]

अन्यायाविरुद्ध आवाज – कवयित्री नेली जाक्स

केवळ यहुदी असल्यामुळे तिला बरेच काही भोगावे लागले. याचेच अनुभव तिने आपल्या कवितेत मांडले आणि तिच्या उत्कृष्ट कवितांना १९६६ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार विभागून मिळाला. सॅम्युअल जोसेफ अग्नान हे आणखी एक लेखक तिच्याबरोबर नोबेल पुरस्काराचे सहविजेते होते. या कवयित्रीचे नाव होते नेली जाक्स. […]

गॅस आणि इलेक्ट्रिक वॉटर हीटर

१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला. […]

वॉटर हीटर (सोलर)

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. […]

आत्महत्या समस्या की उपाय ?

शिर्षक वाचून हैराण झाला असाल परंतु हे आजचे वास्तव आहे हे कुणीही नाकारणार नाही. एखादी समस्या आली की आपण उपाय शोधतो अर्थात अनेक उपाय असतात ते थकले की माणूस त्या समस्यांना कंटाळतो आणि मग तो शेवटच्या उपायाकडे वळतो तो म्हणजे आत्महत्या.
आजपर्यंत अनेक डॉक्टर्स , समन्वयक उत्तम भूमिका निभावतात परंतु मानवी मन भन्नाट आणि प्रचंड वेगवान आहे. […]

काटेरी केनियाची मुलायम सफर

आफ्रिका खंडात पर्यटनाला जाण्याची कल्पना आपल्याला युरोपात जाणे इतकी आकर्षक वाटत नाही मात्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या या पुस्तकातील केनियाच्या सफरीचे वर्णन वाचून आफ्रिकेत जाण्याचे वेध लागले नाहीत तरच नवल! […]

ग्लुकोज मीटर

मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात. […]

आत्मा हरवलेली पत्रकारिता !

मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. […]

1 19 20 21 22 23 222
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..