नवीन लेखन...

दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

मै सूर्य हूॅं..

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!! […]

आजचा राम

विजयादशमी. आपल्या साडेतिन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त. श्रीरामाने रावणाचा वध केलेला दिवस. रामाने-रावणाचा केलेला वध म्हणजे चांगल्याने वाईटावर मिळवलेला विजय. या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या धामधुमीत साजरा होतो. पण होतं काय, की आपण सर्वच या एका दिवसापुरते राम बनून छाती काढून चालत असतो; बाकीच्या दिवशी मात्र आपण साक्षात रावणही लाजेल अशी कृत्य उजळमाथ्याने करत असतो. उजळमाथ्याने याचा अर्थ अगदी उघडपणे, निर्लज्जपणे. कारण आपल्याला रामाचा चेहेरा धारण करायला आवडतं परंतू काम मात्र रावणाचं करायला आवडतं. […]

विद्यार्थी संस्कार

आज सकाळी कामावर जाण्यासाठी निघालो पण नेहमीप्रमाने रोजचा रस्ता पावसामुळे बंध झाल्याने कोंगनोळी पांडेगाव खिळेगाव असा निघालो,सकाळी थोडा हलकासा पाउस पण पडत होता. कोंगनोळी च्या पुढे गेल्यावर कच्चा रस्ता लागतो मी तसाच पुढेजात होतो तेव्हा पुढे तीन शाळेची मुले शाळेला जाताना दिसली, रस्ता तर खुपच ओबडधोबड खड्ड्यांचा आहे त्या वर गाडी चालवायचं काय तर सरळ चालायचं […]

परळला गेलेले दसर्‍याचे नरबळी

पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलावर आज अपघात झाला. असा काही अपघात झाला, की ‘दुर्दैवी’ म्हणतो, फेसबुकवरच श्रद्धांजली वैगेरे वाहतो आणि पुढच्या मिनिटाला सर्व विसरून आपल्या कामाला लागतो. असं काही घडलं, की आपल्याला पुन्हा काही वेळासाठी जाग येते, ती थेट पुढच्या अपघाताच्या वेळेसच. पुढचा अपघात आताच सांगून ठेवतो, मध्य रेल्वेवरचा ‘करी रोड’ स्थानकाची जागा. […]

घुसखोर की मुसलमान ?

अतिरेक्यांना धर्म नसतो, तसा तो घुसखोरांनाही नसतो, असं कुणाला वाटत नाही का? की म्यानमारमधून भारतात घुसलेल्या त्या घुसखोरांच्या आडून त्यांच्या ‘मुसलमान’ असण्याचं राजकारण केलं जात आहे? घुसखोर हा घुसखोरच असतो, असं कुणाच्या मनात कसं येत नाही. […]

नक्की काय करावं?

कुणी नोंद घेतलीय की नाही हे कळायला काही मार्ग नाही, पण गेले काही दिवस एक जाहिरात इलेक्ट्राॅनिक मिडीयावर झळकतेय. ही जाहिरात आहे ‘सहारा श्री’ श्री. सुब्रतो राॅय सहारा यांची. तेच सुब्रतो राॅय सहारा, ज्यांच्यावर गुंतवणूकदारांचे हजारो करोड रुपये लुटल्याचा आरोप सिग्ध झालाय. त्यांचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना कारावासही भोगायला लागलाय. त्यातही त्यांचा आडमुठेपणा सुरुच होता. विविध कारणं दाखवून त्यांनी गुंतवणूकधारकांच्या पैशांतून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव टाळण्याचे त्यांचे उद्योग सरु आहेतच. याला माज म्हणतात आणि हा माज सुप्रिम कोर्टाने बरोबर ओळखून त्यांना काट्यावर पकडलंय आणि कोर्ट त्यांना वेळोवेळी फटकारतंयही. […]

‘ती’ अजूनही आहे …. !!

आजकाल बाळं जेंव्हा ढुंगणाशी बांधलेल्या टोपली सकट जेंव्हा बसतात तेंव्हा त्या बिचार्‍यांना नीट बसताही येत नाही …त्या बाळाला अगदी नैसर्गीकपणे धावतांना पाहिले आणि माझे कुतूहल जागे झाले त्याची आई बाजूला कुठे दिसते का ते पाहू लागलो आणि लक्षात यायला वेळ लागला नाही .. एक साधारणपणे तिशीतील तरुणी त्या बाळाकडे लक्ष ठेऊन होती … त्या आईला मी मुलाच्या नैसर्गिक धावण्याबद्दल आणि बसण्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स दिल्या … […]

भारतीय नावाचे “बेगडी” राष्ट्रीयत्व

एका ओळखीच्या मराठी कुटुंबाच्या घरी गेलो असतांना त्यांचा गोड लहान मुलगा दिसला. त्याला जवळ घेऊन थोडी मस्ती करतांना त्याला त्याच्या वर्गातील एखादी गोष्ट सांगण्यास सांगितले … लगेच त्याच्या “मम्मीने” मागून त्या मुलाला सुचना केली “टेल स्टोरी इन इंग्लिश” ….. […]

⁠⁠⁠एक कडवट सत्य- “VIP” झाला आहे बाप्पा माझा…!

लालबागमधील गणपती म्हणजे मुंबईची शान. एक काळ असा होता की हा गणेशोत्सव सर्वसामान्यांचा होता. हळुहळू त्याचे VIPकरण कसे झाले त्याबद्दल लिहिलंय एका माजी लालबागकराने. […]

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]

1 4 5 6 7 8 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..