नवीन लेखन...

दिवसभरात आपल्या मनात येणारे अनेक विचार.. त्या विचारांना कागदावर.. नव्हे.. संगणकाच्या पडद्यावर उमटवणारे हे सदर

टॅक्सीवाल्याची शिकवण – मन की बात..

केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. मन की बात.. ‘टॅक्सीवाल्याची शिकवण’ ही माझा लेख ‘दैनिक सकाळ’, पुणे व नगर आवृत्तीत ‘मुक्तपिठ’या सदरात नुकताच प्रसिद्ध […]

अपघाताच्या गंभीर प्रसंगातही उदासीनता

मागच्या शनिवारी साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्याचे ठरवले. सकाळी 10.30 वाजेच्या पॅसेंजर रेल्वेने अकोल्याहून शेगावला पोहोचलो. मंदिरात गेल्यानंतर अगदी पाच मिनिटांतच ‘श्रीं’चे दर्शन झाले. लवकर दर्शन झाल्याचा आनंद होताच. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेत परतीसाठी पुन्हा शेगाव रेल्वेस्टेशन गाठले. सायंकाळी 4.30 वाजेच्या पॅसेंजर गाडीसाठी अकोला, अमरावतीकडे जाणा-या प्रवाशांची गर्दी होतीच. हिवाळ्याचे […]

चहापानी

परवाच लाईटची दुरुस्ती व काही दिवसांपुर्वी पाण्याच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याकरिता सरकारी कर्मचारी (ठरलेल्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा, वैतागलेले, दमलेले, अनऊत्साही, सावकाशपणे काम करणारे, ना सुरक्षेची ऊपकरणे ना नियोजित वस्तु…. असो…) आले होते. काम सर्वंच पातळीवर व्यवस्थित झाले… असे गृहीत धरुन कर्मचारीही खुश होते… मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसुन प्रश्नचिन्ह होते..,,,, त्यातील अनुभवी कर्मचाऱ्याने हसुन यथोचित […]

नोटाबंदी आणि मिडिया

नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतातील तमाम बातम्या देणाऱ्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींना खरच मोठ्या प्रमाणावर दैनंदिन रोजगारामध्ये वाढ झाली आहे.. अनेक प्रतिनिधी खेडेगावात जाऊन त्यांना फक्त बँकेमुळेच सर्वांचे हाल होताना दिसतायत…, ईतर सुविधांचा ते प्रश्रच विचारत नाहीत..,,. बिचारे…. स्वताःही ऊन्हातानात ऊभारुन रांगेत थांबलेल्या सर्वंच भारतीयांना फक्त तक्रारीचा प्रश्नांनी सुरुवातकरुन शेवट पंतप्रधानांच्या निर्णयाची अशी फजिती झाली…. असच सांगत आहेत. प्रतिनिधी सुसंस्कृत […]

प्रिय मित्र हेमंत करकरे

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी अतिरेक्यांच्या हल्ल्यात माझा जिवलग मित्र हेमंत करकरे शहीद झाला. दरवर्षी आजच्या दिवशी माझ्या जखमेवरची खपली निघून भावना भळाभळा वाहू लागतात. प्रिय हेमंत मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचाच्या कोपऱ्यात स्वत:च्या अत्यंत कृश शरीराचं मुटकुळं करून खाली मान घालून तो बसला होता. कुपोषित बालक हा शब्द तेव्हा अस्तित्वात नसला तरी आज जाणवतं की […]

नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

ज्या जगात आपण जन्माला आलो आहोत त्या जगाकडे आणि त्यातल्या नानाविध व्ववहारांकडे डोळे, कान आदी ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून आणि मनात अखंड कुतुहल ठेवून जगणं म्हणजेच सुसंस्कृतपणानं जगणं..! ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित असलेले ‘चेतनाचिंतामणी’चं जगणं कदाचित असंच असावं असं मला वाटतं. वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं […]

देवाप्रमाणेच राज्यकर्त्यानीही मला फसवले

“…’देवावर श्रद्धा असावी” हे जवळजवळ सर्वच ध्रम-पंथं सांगत आले आहेत. मला मात्र देवाचे एकूण वागणे आमच्या आजच्या राज्यकर्त्यांसारखे वाटत आले आहे. देव दीनांचा वाली आहे आणि संकटकाली तो भक्तांच्या मदतीला धावून जातो ह्याचे पुरावे पौराणिक ललित वाड्मयाखेरीज मला कुठे सापडतंच नाहीत. तसंच राज्यकर्ते गरीबांच्या मदतीला धावून गेलेयत ह्याची वर्णनं फक्त पक्षाच्या मुखपत्रातच वाचायला मिळतात, प्रत्यक्षात बघायला […]

1 13 14 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..