नवीन लेखन...

शृंगारिक तिलक कामोद

कुठलीही कला, ही किती “अमूर्त” स्वरूपात असते हे जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलेचे शास्त्र अवगत करून घेणे अत्यावश्यक ठरते. संगीत आणि रागदारी संगीत याबाबतीत हा विचार फारच आवश्यक ठरतो. पूर्वीच्या काही संस्कृत ग्रंथात, स्वरांबद्दलची बरीच वर्णने वाचायला मिळतात आणि त्यानुसार, स्वरांचे रंग, देवता इत्यादी बाबी वाचायला मिळतात परंतु या वर्णनांना तसा “शास्त्राधार” सापडत नाही. […]

वैभवशाली भूप

मराठीत एकूणच बहुतेक सगळ्या भूपाळ्या या भूप रागाच्या सावलीत तरी आहेत किंवा रागावर आधारित आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे सकाळच्या वेळेचा शुचिर्भूत भाव आणि प्रसन्न मनोवस्था, यांचा भूपालीच्या रचनेत अंतर्भाव होत असल्याने, चालीसाठी भूप राग जवळचा वाटणे साहजिक आहे. […]

बेजोड तोडी

पंडित भीमसेन जोशी आणि राग तोडी याचे नाते फार जवळचे आहे. त्यांच्या गळ्यावर जणू हा राग कोरलेला आहे!! एकतर पंडितजींचा गळा हा मंद्र सप्तकापासून ते तार सप्तकापर्यंत विनासायास विहार करू शकतो. याचा परिणाम असा, तोडीसारखा सर्वसमावेशक राग, त्यांच्या कडून ऐकणे ही नेहमीच सुखद संवेदना असते. घुमारेदार आणि आश्वासक सूर ही तर पंडितजींच्या आवाजाची खासियत आहे. […]

मन:स्पर्शी भटियार

वास्तविक आपल्या भारतीय रागसंगीतात, सकाळच्या पार्श्वभूमीवर बरेच राग ऐकायला मिळतात तरी देखील भटियार ऐकताना, आपल्या मनात नेहमीच सात्विक भाव येतात, अर्थात हा सगळा संस्काराचा भाग आहे. “पूरब से सूर्य उगा” आणि ऐकताना आपलेच मन ताजेतवाने होते. त्या गाण्याचे सूर मात्र अतिशय सुरेख, मनात भरणारे होते आणि याचे श्रेय, संगीतकार अशोक पत्की यांचे. हेच सूर, आपल्याला “भटियार” रागाची ओळख करून देतात. […]

विक्लांत अहिर भैरव

“मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटात, मन्ना डे यांनी गायलेले, “पुछो ना कैसे मैने रैन बितायी” हे गाणे ऐकले आणि बघितले, तेंव्हापासून माझ्या मनावर या गाण्याचा थोडा प्रभाव आहे. या गाण्यात, आपल्याला, सुरवातीपासून “अहिर भैरव” ऐकायला मिळतो आणि अशा असामान्य गायकीतून आपण या रागाचा आनंद घेऊ शकतो. हिंदी गाण्यात प्रसिद्ध असलेल्या, केरवा तालात हे गाणे बांधले आहे. […]

व्रतस्थ भैरव

भैरव राग, हा भारतीय संगीतातील अति प्राचीन रागांपैकी एक राग मानला जातो. पुढे, रागांचे वर्गीकरण करताना, “भैरव” नावाचा “थाट” निर्माण केला आणि त्याच्या आजूबाजूचे राग त्यात सामावून घेतले. खऱ्या अर्थाने “संपूर्ण-संपूर्ण” जातीचा राग आहे आणि यात, “निषाद”,”धैवत” हे दोन स्वर कोमल लागतात तर बाकीचे पाचही स्वर शुद्ध स्वरूपात, या रागात वावरत असतात. वादी स्वर “धैवत” तर संवादी स्वर “रिषभ” आहे. […]

राग – रंग : प्रास्ताविक

भारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आजच्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे. […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..