नवीन लेखन...

हुरहुरणारा किरवाणी

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर”. मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग “किरवाणी” ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात. रागाचा […]

मोहक गारा

“अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग!!” कविवर्य मर्ढेकरांच्या या ओळी म्हणजे “गारा” रागाची ओळख आहे असे वाटते. खरे म्हणजे मर्ढेकरांची ओळख म्हणजे “सामाजिक बांधलकी” जपणारे आणि मराठी कवितेत मन्वंतर घडवणारे कवी. परंतु असे “लेबल” किती एकांगी आहे, याची यथार्थ जाणीव करून देणारी ही कविता!! वास्तविक हा राग तसा फारसा […]

निरलस पटदीप

मंगेश पाडगांवकरांची एक सुंदर कविता आहे. “तू कितीही लपविले तरीही     मजला नकळत कळते, कळते; पांकळ्यांत दडविले तरीही      गंधातून गूढ उकलते!!” कुठल्याही कवितेचा नेमका आशय लगेच आकळणे, तसे सहज नसते. मनातल्या मनात, अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा(च) लागतो आणि तसाच प्रकार रागसंगीताबाबत घडत असतो. स्वरांच्या मधल्या पोकळीतील स्वर ओळखणे आणि त्यातून अर्थ शोधणे, हेच […]

मुग्ध प्रणयी चारुकेशी

आपल्या रागदारी संगीतातून ज्या भावना व्यक्त होतात, त्या बहुतांशी अतिशय संयत स्वरूपाच्या असतात. किंबहुना, “संयत” हेच रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल. अगदी दु:खाची भावना घेतली तरी, इथे “तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे” असेच दु:ख स्वरांमधून स्त्रवत असते. इथे ओक्साबोक्शी भावनेला तसे स्थान नाही. भक्ती म्हटली तरी त्यात लीनतेला सर्वात महत्व. ईश्वराच्या नावाने काहीवेळा […]

हृदयस्पर्शी आसावरी

रागदारी संगीतातील काही खास मजेच्या बाबी म्हणजे, जर रागांचे स्वरलेखन तपासले तर, एका रागातील काही स्वर दुसऱ्या रागात तंतोतंतपणे सापडतात पण तरीही, प्रत्येक राग वेगळा असतो. त्यानुसार त्यातील भावना, स्वरांची बढत, ताना, हरकती इत्यादी अलंकार, त्याची आभूषणे आणि तेजाळ लखलखणे वेगळे असते. अर्थात प्रत्येक रागात झगझगीतपणा निश्चित नसतो तरीही रागाच्या ठेवणीत फरक नक्की असतो. हे कसे […]

मियां मल्हार

आपल्या रागदारी संगीतात, परंपरेला अतिशय महत्व आहे आणि त्यानुरूप जे संकेत निर्माण झाले आहेत, त्यांची जीवापाड जपणूक करण्याची तोशीस केली जाते. मग, त्यात रागाचे समय, ऋतूप्रधान राग इत्यादी वर्गीकरणे अंतर्भूत होतात. शास्त्रानुसार अभ्यास करायला गेल्यास, शास्त्रात खरेतर, कुठल्याही रागाचा “समय” असा दिलेला नाही तसेच ऋतूप्रधान राग, असे वर्गीकरण केलेले नाही परंतु सुरांचे साद्धर्म्य जाणून घेऊन, असे […]

अनोखा भीमपलासी

आपल्या रागदारी संगीतात काही राग असे आहेत, की त्यांना “अचाट” असेच विशेषण लावावे लागेल. अशा रागांच्या यादीत, भीमपलासी रागाचे नाव अवश्य घ्यावे लागेल. भीमपलासी रागाचे वर्णन करणे फार अवघड आहे. अनेक कलाकार या रागाच्या विविध छटांचे असे काही अकल्पित दर्शन घडवतात की, त्या क्षणापुरते तरी, ते दर्शन, हीच या रागाची ओळख मनात ठसते. भीमपलासी रागाबाबत असे […]

अटकर बांध्याचा हंसध्वनी

भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून […]

निसर्गरम्य पहाडी

डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा “पहाडी” रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. […]

सौंदर्यासक्त ललत

“दंवात आलीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा; अवचित गेलीस पेरीत अपुल्या तरल पावलांमधील शोभा” कवी मर्ढेकरांची अतिशय सुंदर मुग्ध प्रणय दर्शविणारी ही कविता. यातील, तरुणीचे, थंडगार हवेत, भल्या सकाळी येणे आणि जाताना, आपला अननुभूत ठसा उमटविणे, सगळेच अप्रतिम. राग ललत हा याच प्रकृतीचा आहे. प्रसन्न, प्रणयी तरीही संयत आणि मुग्ध आणि नवथर हुरहुरीची थरथर दर्शविणारी. अगदी […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..