नवीन लेखन...

झुळझुळणारा छायानट

“ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे” ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग “छायानट” रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, “षाडव/संपूर्ण” अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात “निषाद” स्वराला स्थान नाही. “पंचम/रिषभ” हे या रागाचे वादी/संवादी स्वर […]

अवखळ आनंदी खमाज

सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे. “जमानेभर का गम या इक तेरा गम, ये गम होगा तो कितने गम ना होंगे” असे लिहून त्याने प्रणयी तडफड […]

लाघवी गौड सारंग

एकाच कुटुंबातील  असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा “घ्यायचा” म्हणजेच त्या स्वराची “जागा” कशी मांडायची, त्यामुळे तेच […]

अमीट कलावती

“जें मत्त फुलांच्या कोषातुन पाझरले, निळ्या लाघवी दंवांत उलगडले, जें मोरपिसांवर सांवरले,       तें –त्याहुनही –आज कुठेंसे       पुन्हा एकदां       तशाच एका लजवंतीच्या       डोळ्यांमध्ये — डोळ्यांपाशी —       झनन -झांझरे मी पाहिले…       पाहिलें न पाहिलें.” पु.शि. रेग्यांच्या या ओळी वाचताना, आणि […]

जोग रागाचे विलोभनीय जग

“अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मींची द्यावी सांग;       कोमल ओल्या आठवणींची       एथल्याच जर बुजली रांग!!” मर्ढेकरांच्या या अजरामर ओळींतून जोग रागाची पुसटशी ओळख मिळते. खरतर शब्द आणि सूर यांची नेमकी सांगड घालणे ते फार अवघड असते. त्यातून कविता हे माध्यम एका बाजूने शब्दमाध्यमातील सर्वाधिक लवचिक माध्यम आणि सूर तर नेहमीच अर्धुकलेली भावना […]

मखमली शुद्ध कल्याण

संध्याकाळ उलटत असताना, रात्रीचे रंग आकाशात पसरत असताना, कानावर “रसिक बलमा” ही काळीज चिरून टाकणारे शब्द येतात आणि डोळ्यातील उरलेली झोप पूर्णपणे उडून जाते!! गाण्याचा पहिल्याच आलापित अवघे स्वरशिल्प उभे करणारा तो अविस्मरणीय आवाज, पहिल्याच झटक्यात आपल्या मनात रुतून बसतो. “रसिक बालमा हाये, दिल क्युं लगाया, तोसे दिल क्युं लगाया” या ओळीतील पहिल्या “लगाया” वर जी भावनांची थरथर […]

अवर्णनीय देस

भारतीय रागसंगीतात असे बरेच राग सापडतात, जे “ख्याल” म्हणून अधिक प्रचलित न होता, उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात बरेच लोकप्रिय असतात. पूर्वी आपण, असे काही राग बघितले आहेत, जसे पिलू या रागाचे असेच नाव अग्रभागी येते. याचे मुख्य कारण, बहुदा या रागाचा उगम लोकसंगीतातून झाला असावा. याबाबत असे देखील विधान करता येईल, “ख्याल” म्हणून या रागात “भरणा” […]

लोभस मधुवंती

मंगेश पाडगांवकरांच्या एका कवितेत, “निकट असूनही श्वासापुरते दूर असावे जवळपणातही पंखांना आकाश दिसावे हवे वेगळेपण काहीतरी मीलनातही सखी अपुल्यातून इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन”. आत्ममग्न तळ्याकाठी आत्मरत व्हावे, तसे होत असताना मिलनाची जाणीव संदिग्ध मनाच्या आंतरिक ओढीतून व्यक्त व्हावी, साथीला काठावरील वृक्षांच्या सळसळीची मंद साथ असावी आणि पाण्याच्या संथ लाटांमधून “कोमल गंधार” प्रतीत […]

ब्रिंदाबनी सारंग

वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची […]

बहारदार बहार

“सुमकेसरकुंतल उडती । पवनावर पोहत तरती; मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती.” कविश्रेष्ठ मर्ढेकरांच्या या ओळींतून निसर्गवर्णन नेमक्या रीतीने आपल्याला वाचायला मिळते. विशेषत:  “मंद गंध भवति भरती । पानपुष्प पुलकित करिती” ही ओळ तर खास “बहार” रागाचीच आठवण करून देते. बहार रागाची जाती “औडव/षाडव” आहे, म्हणजे आरोहात ५ स्वर तर अवरोहात ६ स्वर येतात. आरोही […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..