नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

विरही भैरवी

प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी कसले तरी कसले तरी गाणें गातो प्रत्येक सूर पानाइतकाच झाडांनाही आपला आपला वाटतो गाणें गातात देणें देतात झडून जातात उडून जातात झाडे नुस्ती नुस्ती नुस्ती रहातात आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत, गाणें […]

रोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय

रोहिंग्यांच्या परतपाठवणीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, तीही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यातून या ‘डिपोर्टेशन’च्या निर्णयावर सर्वोच्च शिक्‍कामोर्तब झाले आहे. हा निर्णय भारताच्या राष्ट्रीय संरक्षणाच्या हिताच्या दृष्टीने घेतला गेलेला आहे. […]

भारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह

नेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून देऊन भारताने नेपाळशी भारताच्या बंदरांतून व्यापार करण्याकरता व्यापार करार करणे गरजेचे आहे. […]

एक विदारक अनुभव

आपल्याकडे एक समज आहे आणि त्याच बरोबर आकर्षण देखील आहे – गोऱ्या लोकांच्या समाजाबद्दल. समज असा आहे, “हे लोक किती श्रीमंत असतात आणि किती सुंदर आयुष्य व्यतीत करतात”!! यामधील, दुसरा भाग बरोबर आहे पण पहिला निश्चितच नाही. आयुष्य कसे उपभोगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठ मला, माझ्या साउथ आफ्रिकेच्या १७ वर्षांच्या वास्तव्यात भरपूर मिळाला. अर्थात, मला भेटलेले […]

झुळझुळणारा छायानट

“ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे” ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग “छायानट” रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, “षाडव/संपूर्ण” अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात “निषाद” स्वराला स्थान नाही. “पंचम/रिषभ” हे या रागाचे वादी/संवादी स्वर […]

मला देव दिसला !

परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. […]

साउथ आफ्रिका – जोहानसबर्ग १

जेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार!! मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही. शहर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वाढलेले आणि वाढवलेले आहे. इथे, […]

अवखळ आनंदी खमाज

सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे. “जमानेभर का गम या इक तेरा गम, ये गम होगा तो कितने गम ना होंगे” असे लिहून त्याने प्रणयी तडफड […]

साउथ आफ्रिका-शहर जोहानसबर्ग

आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, […]

लाघवी गौड सारंग

एकाच कुटुंबातील  असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा “घ्यायचा” म्हणजेच त्या स्वराची “जागा” कशी मांडायची, त्यामुळे तेच […]

1 58 59 60 61 62 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..