नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

विरही बागेश्री

रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात. रागाची मांडणी बघायला  गेल्यास, आरोहात पाच स्वर तर […]

लडिवाळ आणि आर्जवी केदार

सर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात […]

हे सार थांबवा ! प्लीज !!

ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती.  त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक  दरवाजा होता.  तो ही पांढरा फटक! […]

वैभवशाली, शांत, निरव…दरबारी

“इश्क मुझ को नहीं वहशत ही सही मेरी वहशत तेरी शोहरत ही सही हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने गैर को तुझ से मोहब्बत ही सही” मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या […]

माझा चड्डी यार – भाग २

आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. […]

अंतर्मुख शिवरंजनी

क्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, “मध्यम” […]

ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो – २६ नोव्हेंबर २००८

२६ नोव्हेंबर २००८ ला  मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात आले. नॅशनल सिक्युरिटी गार्ड  (एनएसजी) दिल्लीवरून विमानाने ११६३ किलोमीटरचे अंतर पार करून २७ नोव्हेंबर २००८ ला सकाळी तीन वाजता’ मुंबईत पोहचले. एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर १८ जण जखमी झाले. […]

पाकिस्तानला इशारा देणारा तडाखा

पाकिस्तानातील एका ब्रिगेड हेडक्वार्टरवर भारतीय लष्कराने जबरी हल्ला केला आहे. गतवेळीसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नसला तरी हा हल्ला महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला आक्रमक कारवाईनेच उत्तर देणे गरजेचे असले तरी भारताने अन्य मार्गांचा अवलंब करून पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे. […]

माझा चड्डी यार – भाग १

आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते,  तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात. […]

1 55 56 57 58 59 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..