नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

मिस तनकपुर हाजीर हो !

म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात. […]

म्युझियम्स आणि फिरती रेल – प्रदर्शने

१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे. […]

असेन मी, नसेन मी !

आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली. […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग दुसरा

असंच एक देखणं हिलस्टेशन म्हणून महाराष्ट्रातल्या माथेरानला नावाजलं जातं. माथेरानचा अर्थही ‘डोंगरमाथ्यावरील जंगल’ असाच आहे. या हिलस्टेशनचा शोध ‘चौक’ या गावातून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला लागला. नेरळकडून माथेरानकडे जाण्यासाठी अनेक वर्षे घोडे व पायवाटेचा मार्ग होता. नंतर अनेक वर्षांनी नेरळ माथेरान रेल्वे बांधली गेली. या रेल्वेबांधणीचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. सन १९००च्या सुमारास या रेल्वेबांधणीची कल्पना एका […]

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग पहिला

जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती […]

चित्रकूट एक्सप्रेस: एक प्रयोग

मध्यप्रदेशातील चित्रकूट ही श्रीरामांची कर्मभूमी आणि नानाजी देशमुखांनी राबविलेल्या विविध प्रकल्पांची जागा आहे. ‘विवेक व्यासपीठा’तर्फे ‘चित्रकूट प्रकल्प यात्रे’चं आयोजन करण्यात आलं होतं. कुर्ला टर्मिनस ते चित्रकूट ही यात्रा-स्पेशल गाडी दिमाखात प्लॅटफॉर्मवर उभी होती. १७ डब्यांच्या गाडीच्या प्रत्येक डब्याला नद्यांची नावं देण्यात आली होती. मंदाकिनी, दमणगंगा, कावेरी, गंगा, यमुना, ही नावं झळकत होती व प्रत्येक डब्यावर ऋषितुल्य […]

विवेक एक्सप्रेस

भारताचं दक्षिणेकडील अखेरचं टोक म्हणजे कन्याकुमारी. इथेच अरबी व हिंदी महासागर एकत्र येतात. स्वामी विवेकानंद या समुद्राच्या किनाऱ्यावरील एका खडकावर ७२ तास ध्यानस्थ बसले होते. जीवनाचं अंतिम रहस्य त्यांना या जागेवर उलगडलं. स्वामीजींमुळे कन्याकुमारी हे स्थान प्रसिद्धी पावलं. अशा या कन्याकुमारी स्थानकाशी भारताचं अति-पूर्वेकडील शेवटचं स्थानक दिब्रुगड हे विवेक एक्सप्रेस नावाच्या लांब पल्ल्याच्या एकमेव गाडीनं आज […]

रामेश्वर-तंजावूर एक्सप्रेस

लंकाधिपती रावणाचा पराभव केल्यानंतर रामाने शिवलिंगाची पूजा जिथे केली, ती जागा म्हणजे रामेश्वरम्. रामनाथस्वामी मंदिर, बारा ज्योर्तिलिंगांतील पवित्र स्थान. गंगोत्री, वाराणसी, रामेश्वर या पवित्र त्रिस्थळी यात्रा केल्यावर महापुण्य लागतं. त्यामुळे हजारो यात्रेकरूंचे जथेच्या जथे रामेश्वरला भेट देत असतात. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्यावर भारतभूमीपासून ५० चौरस कि.मी. परिसर असलेला बेटांचा समूह म्हणजे रामेश्वर व धनुष्यकोडी. ही ठिकाणं मन्नारच्या […]

मुंबई-डेहराडून एक्सप्रेस

भारताच्या उत्तरेला थेट हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं डेहराडून ब्रिटिश काळापासून सर्वांत मोठं लष्कराचं शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. मसुरी, चार धाम व अनेक थंड हवेच्या ठिकाणांना जाण्याचे रस्ते येथूनच जातात. मुंबईपासून थेट डेहराडूनपर्यंत पोहोचणारी पश्चिम रेल्वेवरील सर्वांत जुनी, पहिली लांब पल्ल्याची गाडी म्हणजे मुंबई-डेहराडून एक्सप्रेस. अर्थातच, मुंबईहून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाणारी सर्वांत जुनी गाडी म्हणून हिचं वेगळं महत्त्व […]

1 8 9 10 11 12 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..