नवीन लेखन...

ताण-तणावांचे विषाणू

ताण-तणाव हे आपले पूर्वापार साथीदार आहेत. पिढ्यानपिढ्या ही भावना आपली सांगाती आहे. त्यांच्याशी जसे जमेल तसे जुळवून घेणे हळूहळू अंगवळणी पडते आहे. मात्र ताण-तणाव आता अधिक गंभीर, रौद्ररूप धारण करीत आहेत. आता ते वयोगटांवर अवलंबून नाही की आर्थिक परिस्थितीशी ताण-तणावांना काही देणे-घेणे नाही. ही समस्या आता विश्वव्यापी बनली आहे त्यामुळे त्यावर आता सर्वंकष लसीची गरज कधी नव्हे ते निर्माण झाली आहे. […]

मेल्टिंग पॉट की सॅलड बाउल ?

….. एकेकाळी यालाच आपण “एकत्र कुटुंबपद्धती ” म्हणत होतो आणि हळूहळू त्या पॉटमधील नातं वितळत गेल्यामुळे (अजूनही माझ्या बघण्यात काही सन्माननीय अपवाद आहेत) आता ती “विभक्त कुटुंब पद्धती” झालीय आणि अविभाज्यपणे जीवनपद्धती म्हणून स्वीकारली गेली आहे. सगळी छोटीछोटी घरे म्हणजे सॅलड बाउल्स ! […]

रिडेव्हलपमेंट (पुनर्निर्मिती? पुनर्विकास?)

आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ? […]

आर्त

हे आर्तपण मला वळणावळणावर भेटलंय. काही वर्षांपूर्वी ग्रेसची कॅसेट आणली होती. नंतर “निवडुंग ” ची भेट. पण त्याआधी सदर कॅसेट. तिथे एक आर्त काव्य भेटलं- […]

हरवले आहेत…. !

माणसे मुळात हरवतात का? ती हरवतात म्हणजे नेमके काय होत असते? आणि हरवण्याच्या (जगाच्या दृष्टीने) कालावधीत ही मंडळी कोठे असतात आणि काय करीत असतात? अशी हरवलेली मंडळी खरंच सापडतात का? असतील तर त्याचे पोस्टर का लागत नाही ?- ” सापडले “म्हणून ! शोधाशोध थांबली याचा आनंद नको का? एक वर्तुळ पूर्ण झाले. […]

शीतल नावाचं अशांत वादळ – गौतम करजगी !

बाबा आमटे या दैदिप्यमान सूर्यप्रतापी व्यक्तीची ही नात ! आजोबांनी कुष्ठरोग्यांना जीवन पुनर्बहाल केलं आणि नातीने मागील वर्षी स्वतःचे जीवन संपविले. काही काळ “यूथ आयकॉन” शीतलबद्दल समाज माध्यमांवर फैरी झडल्या. नंतर “पब्लिक मेमरी ” शॉर्ट नांवाखाली सारं शांत ! ही निखाऱ्यावर जमलेली काजळी तिच्या पतीने (गौतम करजगी यांनी) “अक्षर ” या दिवाळी अंकात वरील शीर्षकाचा लेख लिहून झाडली आहे. विसरलेली खपली संयतपणे उचकटून काढली आहे. शेवटी हे नातं असं आहे की लेखन अस्सल (ऑथेन्टिक) वाटतं. […]

‘गौरी देशपांडे’ – WAS ?

…. आणि हे आडनांव ज्येष्ठ भगिनीचे वादळ मला गिरकावून गेलं. तिची यच्चयावत पुस्तके (अगदी शेवटचे “विंचुर्णीचे धडे”) मिळवून/विकत घेऊन वाचली आणि संग्रही ठेवली. “एकेक पान गळावया” हरवलं तर नवं घेतलं. […]

डॉ विकास आबनावें – चार भेटींची कहाणी!

मिरजेला रोटरॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी आणि सुधीर नेरुरकर वालचंद तर्फे तर तो आणि अविनाश भोंडवे बी. जे. मेडिकल तर्फे प्रतिस्पर्धी होतो. दोन दिवस स्पर्धा चालली. (होय त्याकाळी वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धा खरंच दोन दिवस चालत. ५० च्या वर स्पर्धक हिरीरीने आणि चुरशीने भाग घेत असत.) ती आमची पहिली भेट आणि मैत्रीची सुरुवात ! साल होतं -१९८०. […]

‘उंबरठ्या’ बाहेरचा गिरीश कर्नाड !

माझ्यासाठी तो कायम उंबरठ्याबाहेर राहिला. माझ्या प्रिय चित्रकलावंतांच्या मांदियाळीत मी त्याला स्थान देऊ शकलो नाही. त्याची नाटके बघायचा योग आला नाही की भाषणे ऐकण्याचा ! मात्र त्याला “ज्ञानपीठ “जाहीर झाले त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी काहिसा निषेध नोंदविला आणि मग मी कुतूहलाने त्याची पूर्वपीठिका चाळली. ज्ञानपीठ मिळाले म्हणजे हा नक्कीच बाप माणूस असणार ही बांधलेली खूणगाठ तेंव्हा घट्ट झाली. […]

पाय खेचण्याची स्पर्धा!

ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते. […]

1 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..