नवीन लेखन...

मिस तनकपुर हाजीर हो !

म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात. […]

असेन मी, नसेन मी !

आज एके ठिकाणी भूपेंद्र आणि सुवर्णा माटेगांवकरांचे गीत दिसले म्हणून ऐकले- ” बिती ना बिताई रैना “. गुलज़ार /पंचम जोडी, जया /संजीव दुसरी जोडी आणि लता/भूपेंद्र ही तिसरी जोडी. यांपैकी नक्की कोणत्या जोडीने हे गीत अजरामर केलंय, मला १९७० पासून आजतागायत ठरविता आलं नाहीए. यापैकी एक जोडी पडद्यावर दिसली, एक कागदावर आणि वाद्यांमध्ये भेटली तथा तिसरी सरळ आतमध्ये घुसली. […]

सीमाभिंती

या अदृश्य असाव्यात आणि आपल्याला काय चालेल आणि काय नाही याची लख्ख जाणीव त्यांनी इतरांना करून द्यावी. शेवटी सीमाभिंती स्वसंरक्षणासाठी असतात. कोठपर्यंत आतवर प्रवेश आहे आणि कोणत्या पावलापाशी तुमच्या अवकाशातील तटबंदी रोखेल याची दिसेल न दिसेल अशी पाटी प्रत्येकाच्या सीमाभिंतीवर लावलेली असावी. जी व्यक्ती विनापरवानगी त्या अवकाशावर अतिक्रमण करेल तिला बिनदिक्कत बाहेरचा रस्ता दाखविता आला पाहिजे. […]

सर्वसामान्यांचा जीवनोत्सव

सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे. […]

निवडणूक

१९८५ सालच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली ही कविता ! आजही तितकीच ताजी आणि संदर्भयुक्त आहे – […]

जड झाले (मोठेपणाचे) ओझे !

एखाद्याची कोठलीही तयारी नसताना आयुष्य त्याला/तिला बखोटं धरून उचलतं आणि जबाबदाऱ्या खांद्यावर सोपविण्यासाठी उभं करतं. शरीर आणि मन मुलांना मोठ्यांचे काम शिरी घेण्यासाठी तयार करतात-बऱ्याचदा मनाविरुद्ध ! […]

जीना यहाँ, मरना यहाँ !

राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे. […]

मनाची रचना

मन,देह आणि आत्मा यांचे क्लिष्ट मिश्रण म्हणजे मानव ! या तिघांची एकमेकांशी जुळवून घेण्याची सतत धडपड सुरु असते. आणि त्या जुळणीवर आणि परस्परांमधील समन्वयावर व्यक्तीचे आरोग्य आणि चैतन्य अवलंबून असते.माणसाचे वर्तन, मानसिक प्रक्रिया,संवाद या तिघा घटकांवर अवलंबून असतात. […]

1 2 3 4 5 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..