नवीन लेखन...

नाणार रिफायनरी – काही प्रश्न..

नाणार येथील या प्रस्तावित रिफायनरीला ‘ग्रीन’ रिफायनरी असं गोंडस नांव दिलं गेलं होतं. मी ‘ग्रीन रिफायनरी’ची व्याख्या शोधायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की, ‘ग्रीन रिफायनरी’ हा शब्द प्रयोग वनस्पतींपासून मिळवल्या जाण्याऱ्या तेल उद्योगासाठी करतात, खनिज तेलासाठी नव्हे. मग नाणार इथे होऊ घातलेल्या खनिज तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पास ‘ग्रीन रिफायनरी’ असं संबोधण्याचं कारण काय, हे मला समजलं नाही..रिफायनरीच्या संबोधनातच मला मोठा गोंधळ दिसतो आणि हे असं का, याचं स्पष्टीकरण संबंधीतांनी स्थानिक जनतेला देणं गरजेचं आहे. […]

कथुआ, उन्नाव, सुरत आणि राजकारण

आपल्या राजकारणाची पातळी किती घसरलीय ह्याची ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी उदाहरण आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदू, मुसलमान आणि एकूणच सर्व समाजातील लोकांनी आणि विविध नेते/पक्षाच्या आंधळ्या फाॅलोअर्सनी या प्रकरणात भावनांच्या आहारी न जाता, हे नेमकं काय राजकारण शिजत आहे हे समजून घेऊन वागण्याची आज गरज आहे. […]

घाबरलेले पुतळे..

नुकतीच देशात काही पुतळे उखडायची किंवा पुतळ्यांची नासधूस करायच्या काही लहान-मोठ्या घटना घडून गेल्या. जगभरात कधी ना कधी हे होतंच असतं. आता हे चुक की बरोबर, यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही आणि माझी ती पात्रताही नाही आणि या लेखाचा तो विषयही नाही. […]

श्रीदेवी, पद्मश्री आणि तिरंगा..

श्रीदेवीचा दुबईत अपघाती मृत्यू झाला आणि ती बातमी आपल्या रिकामटेकड्या लोकांच्या देशात एकदम महत्वाची झाली. क्षणात आपल्या सर्व वैयक्तिक आणि राष्ट्रीय समस्या शुल्लक झाल्या आणि तीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असावं, याची चर्चा करणं राष्ट्रीय महत्वाचं झालं. टिव्हीवाले Barking News म्हणून जोरजोरात भुंकू लागले आणि आपण खुळे त्या अर्धवट समालोचकाचं कोणतही आगापिछा नसलेलं म्हणणं ऐकून आपापली […]

महाराष्ट्र, मराठी माणूस आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

मराठी माणसाला भांडल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिन्दवी स्वराज्यापासून ते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रापर्यंत मराठी जनांनी सर्व भांडूनच मिळवलंय. फक्त दुर्दैव येवढच, की आता मराठी भाषेसाठी स्वत:ला मराठी म्हणवणाऱ्या लोकांशीच भांडायची वेळ आली आहे. […]

मुंबैकरा, सावध हो

…..तरी येणाऱ्या आपल्या नविन पिढ्यांना त्या विभागाचं बिल्डरने दिलेलं नांव हेच खरं नांव वाटायला लागेल आणि नविन पिढीला आताचं जुनं नांव आणि त्याचा इतिहास कधी माहिती होणारच नाही, ही भितीही आहेच. तेंव्हा मुंबैकरांनो, सावध व्हा..!! […]

गडकरीसाहेब, जरा सांभाळून बोलावं..

मी सध्या कौटुंबिक सुट्टीसाठी गोव्याला आहे. चार दिवसांची ही सुट्टी अगदी निवांत चालली होती. त्यातं कारण या चार दिवसांत माझ्यापुरती टिव्हीलाही सुट्टी दिली होती (फक्त’ तारक मेहता…’ आणि ‘टाॅम ॲंड जेरी’ मी कुठेही असलो तरी पाहातो.) हे कार्यक्रम बीपी-शुगर नियंत्रणात ठेवतात, असा माझा अनुभव आहे.) टिव्ही आणि त्यातील मिडीया नामक मर्कटांच्या लीला हे देशातील बऱ्याच जणांच्या […]

सर्व राष्ट्रपुरुषांचं पुन्हा एकदा ‘राष्ट्रीयीकरण’ करणं गरजेचं आहे..

आपल्या देशाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना, नॅशनलांईज्ड बॅंकांना-जरी त्या राष्ट्राच्या असल्या तरी- जसं त्यांच्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रांतांवरून ओळखतात, तसं बनवून टाकलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे किंवा मराठ्यांचे, राणा प्रताप राजस्थानचे किंवा राजपुतांचे, गुरु गोविंदसिंह पंजाब्यांचे किंवा पंजाबचे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राम्हणांचे वगैरे वगैरे… […]

भ्रष्टाचारावर उपाय आहे, पण तो करायची आपली तयारी आहे काय?

आपल्या जीवावर निवडून आलेल्या राज्यकर्त्यांकडून आणि आपल्याच पैशांवर मिळणाऱ्या सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या पगारावर पोसली जाऊनही पुन्हा आपल्यालाच लुबाडायला तयार असणाऱ्या नोकरशाहीकडून आपण ‘डंके की चोट’पर नागवले जातोय हे कळतंय, पण आता नेमकं काय करावं, हे न कळल्याने निर्माण झालेल्या असहाय्यतेतून, सार्वजनिक यंत्रणाविषयीची सामान्य जनतेच्या मनातली पराकोटीची चीड मी गेले दोन-तिन दिवस अनुभवतोय. या सर्वाॅचा मला एकच प्रश्न होता, की हे संपणार आहे की नाही? संपणार असेल, तर कधी? आणि कसं?… हेच सुचवणारा माझ्या ‘अस्वस्थ मन’ या नविन सदरातील पहिला लेख. […]

1 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..