बायकांचा मूड

बायकांचा रोज मूड वेगळा असतो

-कधी जाम खुश असतात
– कधी चिडचिड करतात
– कधी सगळ्या जगाचा राग येतो
– कधी आपल्यावरच कसे कसे अत्याचार झाले हे आठवतं
– कधी रोमँटिक असतात
– कधी आवराआवरीचा मूड असतो
– कधी राहू दे पसारा , कोण बघतंय असं असतं
– कधी शॉपिंग करायचं असतं
– कधी घराबाहेर पण पडायचं नसतं
– कधी नवीन पदार्थ करायचा असतो
– कधी शिळं खायचं असतं
– कधी हे कधी ते ,रोज नवीन !!
–कधी त्या छान दिसतात , कधी त्यांना स्वतःलाच त्या आवडत नाहीत

बरेच husband लोक सकाळी उठलं कि आधी हवामानाचा अंदाज घेतात ,” आज काय परिस्थिती आहे ” तसे adjust व्हायला , म्हणजे काय ‘कलह नको ‘

भाजी आणायची आहे ? –आणतो

लग्नाला जायचंय –झब्बा घालू ? –घालतो

असे बरेच ….

तर बायका अशा का वागतात ? पुरुष त्या मानाने रोज same असतात . काही फरक नाही .

तर बायका अशा का वागतात ?
स्त्रियांच्या शरीरात ४ वेगवेगळे female hormones असतात , Oestrogen , Progesterone , FSH आणि LH . तर त्या चारही हॉर्मोन्सचे प्रमाण रोज वेगवेगळे असते .

अधिक thyroid , BLSUGAR , त्या दिवशी केलेलं जेवण , दगदग असं सगळं मिळून त्यांची तब्येत ठरत असेल .

त्या मुळेच बायकांचे घराघरात मतभेद होत असतील . प्रत्येकीचI रोज मूड वेगळा असेल .

पण बायका अशा आहेत म्हणून तर रंग आहेत , रस , गंध , निर्मिती आहे . जीवनाला स्वाद आहे नाहीतर एकसुरी झालं असतं

— अंकुश सावंत About Guest Author 505 लेख
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…