नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

अहंकार

लाभले असता सर्व काही.. त्याची कधी मोजदाद केली नाही.. जे थोडेसे काही मिळाले नाही.. त्याची मात्र मोजणी थांबली नाही..।।..१ मन मोकळे कधी ठेवले नाही.. फक्त स्वानंदात रमलो.. मी , फक्त मीच एकटा सर्वज्ञ.. हा अहंकार कधी सोडला नाही..।।..२ काय म्हणावे अशा प्रवृत्तीला ?.. अरे झाडा सारखे जीवन असावे.. जे जे आहे , ते ते सर्व देत […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ६ )

महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते . […]

प्रार्थना

मनासारखे सारे आयुष्य जगावे.. हे स्वप्न अधुरे , मी नित्य पाहतो.. अंबरी घनमेघनांचे अवीट सोहळे.. लोचनी मी अलगद बांधून ठेवितो.. हृदयांतरी बिलोरी प्रतिबिंब तयांचे.. भावशब्दातुनी मीच गुंफीत जातो.. तूच हृदयस्थ ! विराजमान प्रांजला.. स्वप्नातुनी तुला गं मी नित्य पाहतो.. ओढ तुझी गं , ती अव्यक्त अनावर.. क्षणा क्षणाशी रोज तडजोड करतो.. भाग्यरेषा ! साऱ्याच मम भाळीच्या.. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ५)

लेखन किंवा काव्य प्रकाराकडे वळलो नव्हतो. पण योगायोगाने व्यवसायाची व्याप्ती वाढली होती . पण माझ्या अहंपणामुळे / गर्विष्ठपणामुळे / आडमुठेपणामुळे मला व्यवसायात एक मोठ्ठा फटका बसला ..रत्नागिरी जिल्ह्याचे माझे एक मोठ्ठे कामाचे टेंडर नामंजूर झाले होते तो माझा मूर्खपणा होता. खुपच विमनस्क झालो होतो. चिंताग्रस्त झालो. पश्चाताप झाला . मग रत्नागिरीतून सरळ पावसला गेलो ..! तिथे राहिलो. त्या अत्यन्त विदारक मानसिक उद्विग्न अवस्थेत मला पहिली रचना पावसच्या स्वामी स्वरूपानंद मन्दिरातील खालील चिदंबर गुहेत सूचली. हाच टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ ठरला. […]

नि:शब्द वैखरी

मनभावनांही , मौन आता सत्यत्व , अंतरीचे कोंडलेले वैखरीही , जाहली निःशब्द सूरही संवादांचे कोमेजलेले..।।१।। बेचैनी घुसमट जीवाजीवांची नेत्री पाझर ,विरही आसवांचे सांत्वन कुणी , कुणाचे करावे.. हताश ! हात हे उरी बांधलेले..।।२।। उध्वस्त मनी , भय वास्तवाचे.. जिथेतीथे , भीतीपोटी राक्षस.. आज अस्वस्थ , बेजार स्पंदने.. क्षण ! भेटीचेही धास्तावलेले..।।३।। दृष्टांत ! हा या कालियुगाचा.. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ४)

चंदन वृक्षाच्या उपवनात एखादं बाभळीचं झाड़ जरी उगवलं तरी त्या बाभळीच्या झाडाला देखील चंदनाचा गंध येतो .! हाच सहवासाचा परिणाम असतो..! माझ्यासारख्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीबाबत तेच घडलं !!! हा माझा दैवयोग !! […]

नातं जन्मोजन्मीचं

माझं तिच्यावरती प्रेम आहे.. तिचंही माझ्यावर प्रेम आहे.. तिला व्यक्त व्हायला वेळ नाही.. हेही एक अव्यक्त सत्य आहे..।।..१ सर्वांचीच मनांतरे जपण्याचा.. तिचाच निष्पाप स्वभाव आहे.. मला ती नेहमीच गृहीत धरते.. मीही सारे सारे जाणून आहे..।।..२ मुलं,सुना,नातवंड, सासुसासरे.. शेजारी पाजारी , नातेवाईक.. सर्वांनाच नेहमी ती जीव लावते.. निरपेक्ष सर्वांसाठी जगते आहे..।।..३ धावपळीत सरतो सारा दिवस.. थकून निपचित […]

भयाण वास्तव

आघात जीवघेणे किती सहावे.. सारे सारे , मूक गिळूनी पहावे.. जीवा न काहीच संवेदना उरावी.. श्वासही सारेच , विकलांग व्हावे.. हवीत कशाला नाती ऋणानुबंधी.. ज्यांच्या विरहात शोकाकुल व्हावे.. जर जन्माचाच शेवट मृत्यू आहे.. तर उगा कुणात कां गुंतुनी रहावे.. प्रेम , वात्सल्य ,लळा , जिव्हाळा.. जर हे अळवावरचे पाणी असावे.. तर नकोच भावप्रीतीचा ओलावा.. पाषाणासम जीवन […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३)

या १९६३ सालच्या साहित्य संमेलनात मला सहवास लाभलेले. . . . स्व. लोककवी मनमोहन नातू. स्व. लोककवी मनमोहन नातू म्हणजे ” गोपाळ नरहर नातू ” जन्मगाव तासगांव ( कोल्हापुर). जन्मदिन, ११ नोव्हेम्बर १९११. मनमोहन हे त्यांचे टोपण नाव. माझा भाग्ययोगच की मला जीवनात अनेक साहित्यिकांचा जवळून सहवास लाभला. त्यापैकी कै. लोककवी मनमोहन हे एक होते. […]

अव्यक्त मनप्रीता

प्रश्न अनुत्तरीत सदा या जीवनी.. लाभली कां ? जीवा सत्यप्रीती.. मनप्रीता अंतरीची ही निश्ब्दुली.. मी कधीच शब्दात मांडली नाही..।।..१ असलीस जरी तू , दूर कितीही.. तुज मी , कधीच विसरलो नाही.. पाळलीही सुचिता , संस्कारांची.. विरहाची वाच्यताही केली नाही..।।..२ नाते मनहृदयी , सोज्वळ प्रीतीचे.. न उच्छृंखली भोगवादी भावनांचे.. प्रीतीस ! मानुनीया दान संचिताचे.. सत्यता , मी […]

1 38 39 40 41
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..