नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

विधिलिखित

क्षणक्षण, आनंदे जगुनी घ्यावे अजाण,अनभिज्ञ क्षण जीवनी अशाश्वत,असे भाकीत क्षणांचे सदैव! सतर्क रहावे या जीवनी।। भाळीच्या, विधीलिखीत घटना जे घडणारे, ते सारे घडुनी जाते विवेकी मानवतेचा तर्क असावा वास्तवतेला, समजुनी घेता येते।। भिरभिरे, कालचक्र जन्ममृत्युचे झाले, गेले, सारे विसरुनी जाते अलगदी काळ, सावरे दुःखाला संयमे, सहज जीवन जगता येते।। निर्मळी! सहवासाच्या सदिछ्या जीवास, सावरती क्षणाक्षणाला गतजन्मांचेच,सारे […]

भेट नां सांजवेळी

प्रीये, सखे मनस्वामीनी ये नां, सत्वरी सांजवेळी नको नां, आता प्रतीक्षा भेट नां, सत्वरी सांजवेळी।। गोधुळीची धूळ गोकुळी जित्राबांचे, ठसे गोखुरी छुमछुम नादती घुंगराळे भेट नां, राधिके सांजवेळी।। सावळबाधा तूंच सावळी ब्रम्हांडी! तुझी पडछाया पावरीची, रुणझुण कंठी नेत्री घन:श्याम सांजवेळी।। वृंदावनी तेवते दीपज्योती वैखरी, झरते शुभंकरोती तूच मूर्त, प्रसन्न मनगाभारी भेट नां, राधिके सांजवेळी।। अस्ताचलीच्या, वेदिवरती […]

प्रतिभा

या प्रतिभेचे उपवन मनोहर आत्मानुभूतीचा साक्षात्कार संवेदनांचे लाघवी कुंजनवन लोचनी तरळत रहावे निरंतर प्रतिभा! वरदान सरस्वतीचे भावनांचे, अमृतकुंभ विवेकी दैवेप्रारब्ध्ये, प्राशिता अविरत भावाविष्कार! उमलतो निरंतर लडिवाळ भावनांची शब्दफुले कुरवाळीती या तनमनांतराला साक्षात प्रतिभेचे रूप सोज्वळ मम हृदयी, रुणझुणते निरंतर अलवार टपटपती शब्दकोमली मी, वेचितवेचित माळीत जातो अनामिकाची, ती कृपा आगळी मी, लिहीत रहातो असा निरंतर — […]

पराधिनता

अटळ दान, जीवा मृत्यूचे त्याला कधीच घाबरू नये सात्विक, वात्सल्यामृताचे कधीच विस्मरण होऊ नये प्रीतभाव! उर्मी स्पंदनांना त्याचा तिरस्कार करू नये भोग भाळीच्या दुष्टचक्रांचे भोगता, ईश्वरा विसरु नये जन्ममरण! सत्य चराचराचे असत्य! कधीच समजू नये पराधिनता, हा जन्म मानवी देह! अमर्त्य कधी समजू नये विवेकी! सदा सत्कर्म करावे आविचार, मनांतरी करू नये स्मरावे! कृपावंती दयाघनाला अश्रद्धा! […]

जगी न्याय आंधळा

हा न्याय आंधळा, ती प्रीत आंधळी धन सत्य न्यायदा, धन सत्य प्रीती।।धृ।। या युगी धनी ज्येष्ठ वडीलधारी जगी गुणी,निर्धन कनिष्ठ होई मंदिरात, धनिका दर्शन आधी निर्धनास, दर्शनही दुर्लभ होई ।।१।। कलियुगाची हीच रित असली कुठली नाती अन कुठली प्रीती कोण ते जन्मदाते, बंधुभगिनी सखी, संतती कर्तव्याची नाती ।।२।। जो तो हवा तसा धावत सुटला विवेक सारा […]

कृपा भगवंती

मीच स्वतःला ओळखुन आहे मी केवळ एक माणूस आहे भौतिक सुखे सारीच लाभली आत्मिक! सुखदा सत्य आहे न आता मनी दुश्वास कुणाचा आता स्पंदनी या तुप्तता आहे नेत्री, आठव सारे दवबिंदू परी अंतरी संवेदनांची जागृती आहे ना आता सुखदुःखांची गणती भोगप्रारब्ध, सारे भोगले आहे हवे कशाला, कुठलेच हेवेदावे हरिनामी आता मोक्षमुक्ती आहे जे जगले, ती कृपा […]

भातुकली

बालपणीची मैत्रीण माझी भातुकलीतील ती सवंगडी निरागस तो खेळ आगळा मी राजा, ती राणी भाबडी ।। कितीतरी हा काळ हरवला पण आज तीच राणी मनी ती दूर, दूर तर मी हा इथे आठवण, तिची नित्य मनी ।। मला वाटते, भेटावे तिजला अन बोलावे सारे गुज मनीचे जे घडले ते आता घडुनी गेले पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे […]

शब्दगीता

कल्लोळ मनभावनांचा सावट, निमिष वेदनांचे अंतरंगात, सावळबाधा नेत्री उपवन भावफुलांचे ।। ऋतूगंधली, कुसुमसुमने गंधाळ सारा प्रीतभारला उमलता, नित्य शब्दफुले प्रणयगंधी गुछय फुलांचे ।। शब्दाशब्दात, भास तुझा मनी भावनांचे चंद्रचांदणे ओठी झरते काव्यप्रतिभा भावनांत थेंब गंगाजलाचे ।। देहात नांदते, तूं कुमुदिनी आळविता मीच प्रतिभेला शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता भाग्यच! हेची मम भाळीचे ।। — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. […]

दरवळ प्राजक्ती

गुलमुसलेल्या नभाळी प्रतीक्षेत ही सांजवेळा नेत्री, तुझे रूप लाघवी श्वास! हा खोळंबलेला बेभान तो पवन धुंदला गंधता,दरवळ प्राजक्ती मनमोर हा नाचनाचला भाळुनी तव सौन्दर्याला या क्षणी जवळी असावे भावशब्द, तुझे अंतरीचे प्रीतीत माळता, माळता कवेत घ्यावे, प्रीतनभाला — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २१. २१- १ – २०२१.

दान दयाघनाचे

हितगुज तुझिया मनीचे मी सारे ओळखून आहे छान मधाळ बोलतेस तूं मी सारे ओळखून आहे।। मी कां? धरु मौन आता बावरल्या,काळजात या तुझी अव्यक्त भावप्रिती मी आज ओळखून आहे।। प्रियतमे! नकोस गं लाजु प्रीतीच! सार्थक जन्मांचे एक अलौकीक सुखानंद त्या दयाघनाचे दान आहे।। — विगसातपुते (विगसा) 9766544908 रचना क्र २२.

1 28 29 30 31 32 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..