नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. […]

प्रतीक्षा

पसरूनिया दोन्ही बाहू मी उभा तव प्रतीक्षेत भास तुझाच अवकाशी प्रीती पाझरते अंतरात ।।१।। तव स्मृतींतुनी रमता मी न माझाच उरतो श्वासात गंधते कस्तुरी ओठावरी उमलते गीत ।।२।। माहोल, सारा सुगंधी परिमल हा चंदनगंधी सुखवितो या जीवाला लोचनी ओघळते प्रीत ।।३।। आवेग हा भावनांचा व्याकुळ शब्द, शब्द रचितो अलवार काव्य तुझ्याच हृद्य स्मरणात ।।४।। मीच हा […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३०)

आपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो. […]

मनातुरता

क्षिणले स्वर आता थकलेली ही लोचने जाहली कातरवेळा वाटते तुजला भेटावे ।।१।। बिंब ते तेजाळलेले सांजेस गुलमुसलेले गगनही अंधारलेले वाटते तुजला भेटावे ।।२।। उचंबळलेल्या भावना मिठीस आसुसलेल्या शिथिल सारीच गात्रे वाटते तुजला भेटावे ।।३।। क्षितीजी रंग केशरी सत्यप्रीत ती आगळी मन स्मरणात गुंतलेले वाटते तुजला भेटावे ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८० १९ – ६ – […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २९)

अशा अनेक मार्गदर्शक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. खरे तर प्रत्येकालाच तो लाभत असतो. मी फक्त सारे आठवणीत ठेवले आणि आज जे आठवते आहे ते शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. हे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशनच आहे असे मी समजतो. […]

कृष्णरूप

राऊळी, गाभारी नयन मी मिटलेले अंतरंग उजळलेले भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।। रूपडे निळेसावळे कृपासिंधू, कृपाळू ओढ नित्य अनावर भान माझे हरपलेले ।।२।। क्षणक्षण पुण्यपावन भक्तीत रंगगंधलेला ध्यानमग्न मीराराधा कृष्णरूप तेजाळलेले ।।३।। रूप लडिवाळ लाघवी अंतरी साक्ष दयाघनाची निरांजनी दिपवी ज्योत श्वास सारे सुखावलेले ।।४।। वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ७९ १८ – ६ – २०२१.

बाप

आधार निश्चीन्ततेचा वटवृक्षाचीच सावली साथ शाश्वत निर्भयी सोबत सुखदुःखातली ।।१।। मूक, करडे आभाळ सांत्वनी, आधार हात फक्त निस्वार्थीच दाता जीवनाला सावरणारा ।।२।। हाच खरा भगवंत जगी कृपाळू, कृपावंत सदा घडविणारा, जगविणारा पुजावा, भजावा अंतरी ।।३।। वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. ८३. २० – ६ – २०२१.

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २८)

शिक्षणतज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य डॉ. न.म. जोशी सरांचा उल्लेख मी बहुतेक सर्वच भागामध्ये केलेला आहेच. नम. जोशी सर मूळ ता.पाटण जिल्हा सातारा येथील शिवाय त्यांचे पुणे येथील वास्तव्य सदाशिव पेठेत. माझे गाव सातारा आणि पुण्यात सदाशिव पेठेत माझ्या मुलाचे ऑफिस. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)

गुरुवर्य मा. श्री. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ज्येष्ठवृंद, अभ्यासु प्रख्यात समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. सर्वश्रुत व्यक्तीमत्व. प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभणं म्हणजे एक आनंदच! […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)

जीवनात येणाऱ्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून आपण काहीतरी शिकत असतो. व्यक्ती तितुक्या प्रकृती असे सर्वश्रुत आहे. मी जरी लेखांकाच्या हेडिंग मध्ये सात्यिकांचा सहवास एक संस्कार असे जरी म्हटले असले तरी त्याचा तसा शब्दशः अर्थ घेवू नये. […]

1 27 28 29 30 31 34
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..