नवीन लेखन...

पाऊस सरी पडतांना

पाऊस सरी पडतांना गारवा अंगास झोंबतो, मिठीत तू अलवार घेता घन ओथंबून पाऊस येतो मलमली मिठीत मी येता अश्रूंचा बांध अलगद फुटतो, डोळे हलकेच तू पुसता तो पाऊस मनात मोहरतो किती मनोहर हा नजारा डोळ्यांत निसर्ग खुलतो, हा ओला हिरवा गालिचा थेंब पावसाचा हृदयात मिटतो घन व्याकुळ मी होते चिंब पावसाळी नभात या, कधी भेटशील सख्या […]

इथं आपल्याला आवडतं

इथं आपल्याला आवडतं ते लोकांना आवडेल असं नाही, लाईकच गणित कळतं नाही इथं तर कमेंट देणं फार दूरस्थ होई कुणी कुणाला विरोध म्हणून दुसऱ्याला लाईक कमेंट देतात, कुणाचा राग ही न बोलता मग इमोजीत व्यक्त करतात कुणाचे किती कौतुक केले तरी लोकं मागचं आठवतात, एकाला कमी लेखण्यासाठी दुसऱ्याचं वारेमाप कौतुक करतात चांगलं लिहलं तुम्ही तरी इथे […]

शृंगार वेलीवर एक वेल बहरावी

शृंगार वेलीवर एक वेल बहरावी हलकेच स्पर्शात तुझ्या सांज मोहरावी तप्त ओठांवरी ओठ आल्हाद टेकता चुंबनात न्हाले दोन तन एकांत क्षणा मिठीत अलवार स्पर्श सोहळे सजले साखर चुंबनात ओठ ओठांना भिडले वारा ही तेव्हा अवखळ बावरा होता पदर वाऱ्यावर उडून लाज डोळ्यांत साठता केशर संध्या समयी पाऊल वाटेवर थबकले हात हातात अलगद नजर स्पर्श काही बोलले […]

तो शेवटी पुरुषच असतो

तो शेवटी पुरुषच असतो नवरा हे नावं असतं सगळे नवरे इथून तिथून सारखे तो शेवटी पुरुषच असतो कुठे हो स्त्री किंवा बायको पूर्णपणे स्वतंत्र असते या युगात ही नवऱ्याच्या कलाने स्त्री वागत असते सासर माहेर दोन्ही नाती स्त्रीच जास्त जपत असते पुरुषाला इतकी नाती सांभाळण्यात फिकीर नसते दोन्हीकडे नाती निभावतांना स्त्रीची होते कधी मेटाकुटी नवरा खुशाल […]

गळ्यातल्या एका मंगळसूत्राने

गळ्यातल्या एका मंगळसूत्राने तिची वाट सोयीस्कर वाटते डोळ्यांतल्या अश्रुंचे मोजमाप काळ्या मण्यात सुख झाकून ती सोन्याच्या वाट्यात दुःख लपवते झोपडपट्टीतील बाई नवरा मारतो हे टॉवरमधील बाईला सांगते टॉवरमधील उच्चशिक्षित स्त्री त्यावेळेस नवऱ्याचा मार मेकअपच्या आधारे लपवते अशिक्षित किंवा उच्चशिक्षित दोघींची दुःख सारखी असतात नवऱ्याने दिलेल्या जखमा की वेदना एक बोलून एक न बोलून सहन करतात काळ […]

वाटेवरील वळणावर वळण

वाटेवरील वळणावर वळण तू घेऊ नको ओल्या भावनेत डोकावून तू थांबू नको मनातल्या मनात मोहरुन तू जाऊ नको भाव व्याकुळ स्वप्नांत तू येऊ नको हृदयस्थ हृदयात जीव तू लावू नको आरक्त डोळ्यांत तुला तू शोधू नको शब्दातल्या शब्दांचे चांदणे तू लेवू नको मधाळ मधाचे जाळे तू वेढू नको भावनेतल्या भावनांचे भाव तू व्यापू नको स्पर्श मलमली […]

रडवून जाणाऱ्या हसवून जाणाऱ्या ग

रडवून जाणाऱ्या हसवून जाणाऱ्या ग बाई ग या कथा तुझ्या व्यथा तुझ्या ग कोणाला न कधी उलगडून त्या जाणार ग बाई ग हसते तू बोलते तू ग उरातले दुःख हलकेच लपवते तू ग कोणाला न कधी ते दुःख तू सांगणार ग रडले काय विझले काय नयन तुझे ग बाई ग कोरड्या डोळ्यांत पाणी थिजले ग कोणाला […]

शांत मनाच्या डोहात

शांत मनाच्या डोहात गूढ अगम्य साचले काही कुणी पुसले नयन ओले कुणी बाण विखारी मारले काही संन्यस्त ऋषींच्या आश्रमी थबकाव अंतरीचा झाला पांथस्थ येता अवचित जीवनी जीवनाचा आलेख कळला ती मोहात गुंतली अलगद सीता का पेटून उठली पांचाली होमात धगधगले यज्ञकुंड ज्वाळानी समिधा दोघींच्या पडल्या त्यात अजूनही मुक्त कुठे न बाई आई सांगून जाते स्त्री मर्यादा […]

घन आभाळी सर पावसाळी

घन आभाळी सर पावसाळी तू येशील कधी सख्या मी बावरी, ये हलकेच सख्या त्या धुंद वेळी वाट पाहू किती आरक्त मी होऊनी.. मोहरले मन वेल्हाळ होऊनी ये असा अलगद तू कातर वेळी, मी येते अलगद चोर पाऊली पाऊस सरी बरसतील त्या वेळी.. घे घट्ट मिठीत ओढून तू मजला, अधर रोमांच उठतील गाली तेव्हा, ओठ टिपून घे […]

प्रत्येकाला इथं दुःख असतं

प्रत्येकाला इथं दुःख असतं असतं फक्त ते दिसतं नसतं, हास्य वरवर सगळीकडे असं म्हणून त्यात ते कळतं नसतं.. गैरसमज करणं इथं तर खूप सोप्प सहज असतं, किंवा गैरसमज करुन घेणं नित्य रोज होतं असतं.. तू मला बोलला मग मी राग तुझ्यावर तो धरेन, दोन शब्द तुला जास्त बोलेन हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं.. दुसऱ्याला गृहीत धरण […]

1 2 3 4 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..