नवीन लेखन...

तुझ्या मिठीत मी

तुझ्या मिठीत मी अलवार गंधाळून गेले, बंध मलमली सारे हे भास तुझा अंतरी असा रे.. घेता तू घट्ट मिठीत मग चांदणे नभात चमचमे, सैलावेल गात्रे तुझ्यात माझी हलकेच समर्पित मी होता रे.. स्पर्श तू अलगद करता जाईल मी मोहरुन रे, ओठ तू अलवार टिपता गोड होईल साखर चुंबन रे.. अत्तराचा गंध केतकी काया अधर जरा बहरते, […]

का पुन्हा पुन्हा मी

का पुन्हा पुन्हा मी गुंतून जात आहे, कशी ओढ ही मग तुझ्याकडे ओढते आहे.. नको होते मोहक तुझी आठवण ती, परी होते रोज मग तुझी गोड साठवण ती.. न विसरले तुला मी न विसरल्या भावना, अबोल वेदना हृदयात उरल्या आठवणी पुन्हा.. मन दुःखी होते असे ओढाळ होतात भावना, नको गुंतणे मग हे विरतात नाजूक जाणिवा.. — […]

जाई जुईचं अलगद बहरण

जाई जुईचं अलगद बहरण की मंद निशिगंधाच दरवळण, गुलाबाच टवटवीत होणं की प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं.. कमळाच पाण्यात भावणं की मोगऱ्याच गंधित होणं, जास्वंदीचं तरारुन उमलण की झेंडूच भरभरुन डवरण.. तगरीच साधस दिसणं की चाफ्याच गंध धुंद करणं, शेवंतीच नाजूक ते फुलणं की बकुळीच अबोल होणं.. रातराणीच धुंद आल्हाद होणं की अबोलीच अबोल लाजण, फ़ुलांचं हे […]

रात्र सरकता आल्हाद

रात्र सरकता आल्हाद तुझी आठवण नित्य येते, तुझ्या अव्यक्त मिठीत तुझी सल मनात बोचते येशील का तू अवचित कधी मला सहज सख्या भेटायला, घेशील मिठीत अलवार तेव्हा डोळ्यांत अश्रू होतील जमा तुझ्या मिठीत मी पुरती हलकेच मोहक गुंतून गेले, दूर जरी मी अलगद जाता सय तुझी रोज आताशा येते कसे सहज विसरावे तुला मोह तुझ्या मिठीचा […]

चहा आणि साखर

चहा आणि साखर ह्यांच मिश्रण होतं मस्त, चहा होतो सुंदर मग घाला थोडं त्यात आलं जायफळ तल्लफ येता चहाची चहा मग नक्की प्यावा, वेळ किती झाला घडाळ्यात ह्याचा हिशोब न तो करावा करते स्वाती आग्रह प्रेमाचा चहा प्यावा सुमधुर असा, रसिकहो माझ्या या चहा काव्यांला एक लाईक तर नक्की हवा — स्वाती ठोंबरे.

तुटल्या तारा त्या

तुटल्या तारा त्या झंकारत नाही, अबोल चांदण्यात चंद्र उजळत नाही कोरड्या शब्दांत भाव उमटत नाही, वेदनेतल्या जाणिवांचे कढ दिसतं नाही मिटल्या फुलांचा वास उरतं नाही, तोडल्या मनात सुख उरत नाही झोका स्वप्नातला एक झुलवून गेला, रिक्त मनात आल्हाद जीव पोळला खेळ झाला असा भावना विरल्या, निर्जीव भावली सम खेळ रंगला मन कोमेजले अधर नव्हती कल्पना, कोण […]

भान हरपले विठ्ठला

भान हरपले विठ्ठला तुझ्या चरणी देह माझा, भोळ्या भक्तीचा तू भुकेला धाव घेई तू भक्तांच्या साह्याला रुप तुझे सावळे कटीवरी हात असे, मुखी विलसे हास्य सदा सावळ्या तू हरी विठ्ठला पंढरपुरी असे वास वर्णावे काय तुझे चरित्र, धन्य धन्य होतो जीव तुझ्या दर्शनाची आस हृदयी सदा — स्वाती ठोंबरे.

अनंतात नाम तुझे

अनंतात नाम तुझे तुझ्या चरणी माथा, कानडा विठ्ठल तू उभ्या पंढरीचा राजा धाव घेतो तू सत्वरी भोळा भाव भक्तीचा, नामदेवाची खातो खीर काय वर्णावा तुझा सोहळा जनीचे दळतो दळण सावत्या माळ्याचा पिकवी मळा, श्रीखंडया बनून पाणी भरले एकनाथांच्या घरा चंद्रभागेच्या तिरी जमला साऱ्या वैष्णवांचा मळा, तुझ्या नामात तल्लीन होतो भक्तांचा हा मेळा ज्ञानदेवांनी सुरु केली वारीचा […]

तुझ्या मलमली मिठीत

तुझ्या मलमली मिठीत मी अलगद मुग्ध व्हावे, ओढ हलकेच तुझी लागता भूल आल्हाद हृदयी जपावे काय असेल तो रम्य क्षण तू मिठीत मज अलवार घेता, लाजेल मी रोमांचित होऊन स्पर्श होईल तुझा नाजूकसा का भूल मला पडली तुझीच आस तुझी अंतरी लागता, ती मिठी उत्कट अबोध व्हावी होतो मोह तुझा अधर भावना किती कितीक समजावू मनाला […]

स्वामींची प्रेमळ माया

स्वामींची प्रेमळ माया असेल कृपा छाया, भक्तांना मिळेल सदा मायेचा अथांग ओलावा गजानन महाराजांची कीर्ती करुणाकर प्रेमळ मूर्ती शांत चित्ती भाव मुखी लाभेल कृपा प्रसाद मस्तकी मिळेल निश्चित अनुभूती ठेवावी श्रद्धा अंतकरणी, अक्कलकोट स्वामींची महती शेगाव नगरी पावन ती पंढरी — स्वाती ठोंबरे.

1 2 3 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..