नवीन लेखन...

प्रत्येकाला इथं दुःख असतं

 
प्रत्येकाला इथं दुःख असतं
असतं फक्त ते दिसतं नसतं,
हास्य वरवर सगळीकडे असं
म्हणून त्यात ते कळतं नसतं..
गैरसमज करणं इथं तर
खूप सोप्प सहज असतं,
किंवा गैरसमज करुन
घेणं नित्य रोज होतं असतं..
तू मला बोलला मग मी
राग तुझ्यावर तो धरेन,
दोन शब्द तुला जास्त बोलेन
हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं..
दुसऱ्याला गृहीत धरण
सहज मग होतं असतं,
जबरदस्तीच गणित त्यात
नकळत सहज घडतं असतं..
हक्काने रागवणार ओरडणार
मोठं माणूस आपुलकीच नसतं,
झाली चूक तर दाखवणारं आता
आयुष्यात मोठं माणूस समोर नसतं..
नातं पण हल्ली उलगडत नसतं
एकमेकांना काय हवे कळतं नसतं,
साधा गजरा आणण पण प्रेम आहे
जुन्या पिढीतील हे प्रेम आता माहीत नसतं..
दोघांचं चुकलं जरास कुठे हल्ली तर
ओरडण राग हे नवरा बायकोत होतं,
भांडण राग ह्यात वेळ सगळा जातो
प्रेम करायला मग अबोला सोबत उरतो..
फास्ट दुनियेत सगळचं फास्ट मग
पैसा जवळ खूप ह्यातच सुख कळतं,
गरजा कमी करुन थोडं तडजोड करुन
आनंद मिळतो हे मग साधं गणित न कळतं..
घरी आणि बाहेर पण नित्य हेच
सगळीकडे घडतं ते असतं,
हक्क आणि राग ह्यात पटकन रुसणं
पण समुजन घेणं दुसऱ्याला होतं नसतं..
कुणीही आवडून जावं सहज मनात
अशी लोकं भेटणं आयुष्यात छान घडतं,
नशिबात असेल तितकं दान मिळतं
हेच तर जीवनाचं अंतिम सार ठरतं
कुणी मनात गोड आवडून जावं
अस हल्ली लोकांचं वागणं होतं नसतं,
आणि आवडलं मनापासून कुणी तर
ते सांगणं पण हल्ली कठीण असतं..
मोह व्हावा अगदी साध्या गोष्टींचा
पण त्या गोष्टी मिळणं अवघड ठरतं,
देव करतो रचना ही अशी निराळी
नशीबाचा दैव फेरा काय ते मग समजतं..
मरणं सोप्प सहज हल्ली झाले
जगणं फार कठीण होऊन बसलं,
करोना कधीही घालेल घाला आता
भीतीच हे संकट थोडं मनात असतं..
कोण कधी फटकन जाईल
कुणाला हे कधी माहीत नसतं,
आज आहे क्षण आपला आनंदाचा
तरुण म्हातारं काही मरणदारी नसतं..
आज करते स्वाती कविता ही
पण उद्या माझं ही मरणं येऊ शकतं,
नसेल मग मी ह्या जगात अशी
कधीही श्वास जाऊ शकतो..
हेच अंतिम सत्य आयुष्यात
भरवसा जगण्याचा जरा नसतो,
नको राग द्वेष कटुता भांडण सारे
मेल्यावर मग हळहळ करणं उरतं..
जीवनाचे सूत्र हे सहज साधे
माणूस अवघड ते करतो,
समजून न घेणं दुसऱ्याला मग
गैरसमजाचं दुष्ट चक्र ते फिरतं..
वाचा कविता ही रसिकहो
मनात किल्मिश कधी नसावं,
येईल मरणं माझे कधीही मग
काळ समोर कधी येऊ शकतो..
निसर्ग,फुलं,पाऊस,काव्यांत
मन सहज बेधुंद मुक्त करावं,
कुणी आवडलं मनापासून मग
हृदयात गोड बंदिस्त करावं..
कविता झाली माझी मोठी खूप
तरी रसिकहो वाचा तुम्ही सारे हो,
गंध कवितेचा मनात माझ्या नेहमी
स्वातीच्या प्रेमात राहील तारा हृदयस्थ..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..