नवीन लेखन...
Avatar
About स्नेहा कोलते
स्नेहा कोलते या दैनिक प्रहारमध्ये पत्रकार आहेत त्यांना विविध विषयांवर लिहायला आवडते. त्यातही कला, साहित्य आदी विषयांवर लिहीणे पसंत आहे.

बाप्पाच्या स्वागतासाठी ‘आगमनाधिश’

बाप्पाचं आगमन अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलंय. काही प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपूजन सोहळे झाल्याने मंडळांमध्ये आता मंडप सजावटीसाठी सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तरुणाईही त्यांच्या हटके पद्धतीने बाप्पाचं आगमन करायला सज्ज झाली आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात काढलेले तब्बल 4 हजार व्हिडीओ शॉट्स केवळ 5 मिनीटांत दाखवण्याचा प्रयत्न सर्वेश शिर्के या तरुणाने केला आहे. सर्वेश शिर्के […]

जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन – ब्रेव्हहार्ट

चित्रपट हे एक माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमातून परिवर्तनही घडवता येऊ शकतं. या माध्यमाचं काम केवळ मनोरंजनात्मक न राहता विविध विषय हाताळून विस्तारत जात आहे. बायोपिक चित्रपट हे देखील त्यातीलच एक. बायोपिक चित्रपट प्रेक्षकांना ऊर्जा देण्यासाठी बनवले जातात. […]

तरुणांच्या कलागुणांना डिजिटल व्यासपीठ

तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी आता उत्तमोत्तम व्यासपीठ मिळत आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल व्यासपीठाचा विचार करता फेसबुक, युटयूबसारखे सामाजिक माध्यमं आपल्यासमोर येतात. तरुणाई या सोशल मीडियाचा व्यासपीठ म्हणून कसा वापर करते यावर थोडीशी नजर टाकू या. गेल्या अनेक वर्षात मनोरंजनाची साधने बदलत गेली आहेत. चित्रपट, मालिका, नाटके आदी साच्यातून बाहेर येऊन आता वेब सिरीज प्रचलित झाली. यू […]

एका जिद्दीचा प्रवास

स्त्रियांना वर्ज्य असणार्‍या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्‍या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया. एकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या […]

चतुरस्त्र तरुण – पराग सावंत

आवड असली की सवड मिळते असं म्हणतात; मात्र आवड असली की शिक्षणही मिळतं हे आता पराग सावंतकडे पाहिल्यावर कळतं. बीएससी झाल्यावर इंटरनेटलाच आपला गुरू मानून नृत्य, फोटोग्राफी, व्हीडिओग्राफी, एडिटिंग यांचं शिक्षण घेतलं. आवड म्हणून बाबांनी त्याला कॅमेरा आणून दिला. त्यावेळेस तो एका एशियन हार्ट कार्डिकमध्ये कंपनीत नुकताच कामाला लागलेला. बीएससी झाल्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद त्याला होताच; मात्र मनात […]

लायब्ररी

एक वास्तू माझ्या-तुमच्या, सगळ्यांच्या कॉलेजमध्ये आहे. आपण येता-जाता ती नेहमीच बघतो. कोणती ही वास्तू?आठवतं का? ही आहे आपल्याच कॉलेजमधली लायब्ररी. बरेच दिवस इथे तुमची पावलं फिरकली नसतील तर चला एक फेरफटका मारू. कॉलेजातली लायब्ररी.. एका कोप-यातली.. शांत शांत. जिथे पाऊल टाकताना तिथल्या शांततेचा दबदबा वाटतो. जरा कुठे खुट्ट आवाज झाला की सर्व कोप-यांमध्ये अचूक नजर ठेवून […]

बंध ऑनलाईन मैत्रीचे

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..